१० वर्षांवर सहकार संस्थेचे अध्यक्षपद नाही

0
183

कायद्यात दुरुस्ती करणार
राज्यातील गृह प्रकल्प सोसायट्यांच्या ज्या समस्या आहेत त्याचा अभ्यास करण्यासाठी सरकारने समिती स्थापन केलेली आहे, असे सहकारमंत्री दीपक ढवळीकर यांनी सहकार खात्याच्या मागण्यांवरील चर्चेस उत्तर देताना सांगितले.
सहकारी संस्थात शिस्त आणण्यासाठी काही घटना दुरुस्त्या करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. कोणत्याही सहकारी संस्थेवर एखाद्या व्यक्तीला अध्यक्ष म्हणून १० वर्षांपेक्षा जास्त काळ राहता येणार नाही अशी दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. सहकारी संस्थांना सहा महिन्यांनी एकदा एजीएम घेणे सक्तीचे करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बाष्पक व कारखाने या खात्याच्या मागण्यांवर उत्तर देताना ते म्हणाले की, राज्यातील कारखान्यांत झालेल्या अपघातांपैकी १५ प्रकरणांची चौकशी करण्यात आली आहे. पैकी सहाप्रकरणी कारखान्यांच्या व्यवस्थापनांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. विविध कारखान्यांत आरोग्याविषयीचे सर्वेक्षण करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.