१०० दिवसांत काळा पैसा येणार असे कधी सांगितले ?

0
84

सरकारने सुनावले
लोकसभेत काळ्या पैशांप्रकरणी विरोधकांनी धारेवर धरल्यानंतर, १०० दिवसांत विदेशातील सर्व काळा पैसा देशात घेऊन येऊन असे कधी सांगितलेच नव्हते, असे सरकारकडून सांगण्यात आले.
काळ्या पैशांविषयी पाळेमुळे खणून काढण्यासाठी कृती दलाची स्थापना केली जाईल, असे संसदीय व्यवहार मंत्री एम. वैकय्या नायडू म्हणाले. सर्व काळा पैसा १०० दिवसांत सांगण्याइतके आम्ही अपरिपक्व कधीच नव्हतो, असेही नायडू म्हणाले. शंभर दिवसांत काळा पैसा आणतो सांगणारे भाजप नेते, सरकार येऊन सहा महिने उलटले तरी काहीच कसे करू शकले नाही, असे विचारून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. शंभर दिवसांत काळा पैसा आणतो याचा अर्थ, काळा पैसा आणण्याची प्रक्रिया सुरू करू असो होता, असे नायडू म्हणाले.