- वैदू भरत म. नाईक
(कोलगाव)
मात्राबस्तिमुळे बलवृद्धी, सुखवृद्धि हे अपेक्षित लाभ मिळत आहेत की नाही याची वैद्यांनी खात्री करून घ्यावी. परिहार – मात्राबस्तिचिकित्सा सुरू असताना कोणताही विशेष परिहार सांभाळण्याची जरूरी नाही. आरोग्यदायी दिनचर्या ठेवणे मात्र महत्वाचे आहे.
व्याख्या – अल्पमात्रेत दिला जाणारा स्नेहबस्ति म्हणजेच मात्राबस्ति होय. हा अनुवासन बस्तिचाच एक प्रकार आहे.
उपयोगिता – (१) मात्राबस्तिमध्ये दिल्या जाणार्या स्नेहाचे प्रमाण अनुवासन बस्तिच्या निम्म्याहूनही कमी म्हणजे ३० ते ७० मि. लि. असते. अनुवासन बस्तिद्वारे शरीरामध्ये एकमार्गी स्नेह प्रविष्ट केला जातो. या स्नेहाचे प्रमाण जर गरजेपेक्षा अधिक झाले तर अनुवासन बस्तिमुळे व्यापत् निर्माण होतो. (१) वातावृत्तस्नेह (२) पित्तावृत्तस्नेह (३) कफावृत्तस्नेह (४) अन्नावृत्त स्नेह (५) पुरीषवृत्तस्नेह (६) अभक्तप्रणितस्नेह हे व्यापत् आहे.
साधारणतः ६० मिली मात्रेपर्यंत स्नेह बस्तिद्वारे दिला गेल्यास वरील व्यापत होत नाहीत. त्यामुळे रुग्णांना ही बस्ति नित्य देता येते. अनुभवाने ३० ते १०० मिली ही मात्राबस्तिची निर्धारित मात्रा आहे. वय, वजन, शारीरिक स्थिती, व्याधी अवस्था इ. घटकांनुसार यामध्ये योग्य तो फरक वैद्याने करावा. व्यक्तीपरत्वे ही मात्रा भिन्न असते.
(२) या बस्ति प्रयोगाचे वेळी विशेष पथ्य व परिहार पाळावे लागते नाही.
(३) जरी हा अल्प मात्रेत दिला जाणारा स्नेहबस्ति आहे. तरी त्यामधील वातशमनाचा गुणधर्म चांगला असल्याने पुढील रुग्णांच्यामध्ये या बस्तिचा वापर करावा. श्रमाने, व्यायामाने, प्रवासाने भारवाहनाने थकलेले, चालण्याने थकलेले, मद्यपान, अतिमैथुन यामुळे क्षीण झालेले, अत्यंत दुर्बल व वातव्याधींनी ग्रस्त रुग्णांमध्ये मात्रा बस्ति श्रेयस्कर आहे.
मात्राबस्ति निषेध – हा बस्तिचा तारतम्याने अनेक अवस्था, व्याधी यांमध्ये देता येतो. त्यामुळे जवळपास या बस्तिला निषिद्ध असा कोणताच व्याधी नाही.
संभारसंग्रह – उपकरण –
(१) प्लॅस्टिक किंवा काचेची सिरींज ५० ते १०० सी. सी. आकाराची
(२) सिंपल रबर कॅथेटर (रबरी नलिका)
(३) मध्यभागी गोलाकार छिद्र असेलला स्वच्छ कापडी नॅपकिनरफूट, २ फूट
(४) बस्तिपीठ (५) हायब्रेटर (६) कार्पास पिचू (७) रबरी हातमोजे.
औषधी –
(१) सुयोग सिद्धस्नेह – मात्राबस्तिसाठी
(२) करंजतेल – निंबते – गुद वरबरी नलिका यांचे स्नेहासाठी
उपचारक – उपचारकाने स्वच्छ, निर्जंतुक रबरी हातमोजे आपल्या हातामध्ये घालावेत. ट्रीटमेट गाऊन परिधान करावा.
काल – (१) मात्राबस्ति सर्व ऋतुंत दिला जातो.
(२) सर्व वयाच्या रुग्णांसाठी देता येतो.
(३) अल्प भोजनोत्तर द्यावा. सकाळी १० ते १२ अथवा सायंकाळी ४ ते ६ ही वेळ योग्य.
(४) रात्री मात्राबस्ति देऊ नये.
(५) मात्राबस्ति हा दररोज ओळीने अधिकाअधिक एक महिना द्यावा. काही वैद्य एक दिवस आड करून देतात.
रिकाम्या पोटी मात्रा बस्ति देऊ नये.
पूर्वकर्म – आतुरसिद्धता/आतुरपरिक्षा/भोजनादि
व्यवस्था – अनुवासन बस्तिप्रमाणे
प्रधानकर्म – अनुवासन बस्तिप्रमाणे
पश्चातकर्म – अनुभासन बस्तिप्रमाणे
परिक्षण – (१) स्नेहन पूर्ण झाले आहे का याची तपासणी रोज करावी
(२) मात्राबस्ति दिल्यानंतर लगेच स्नेहन बाहेर येणार नाही याची काळजी घेणे.
(३) बस्ति प्रत्याराम झाला का? बस्ति दिल्यानंतर किती वेळाने? बस्ति प्रत्यागमामध्ये स्नेह द्रव्य किती बाहेर पडेल? पुरीष – मळ किती बाहेर पडेल? रक्त, आव, कृमि आदि इतर घटक पडले का? या सर्वांचे प्रश्नाद्वारे परिक्षण करून त्यांची नोंद वैद्याने घेणे आवश्यक आहे.
मात्राबस्तिमुळे बलवृद्धी, सुखवृद्धि हे अपेक्षित लाभ मिळत आहेत की नाही याची वैद्यांनी खात्री करून घ्यावी.
परिहार – मात्रा बस्ति चिकित्सा सुरू असताना कोणताही विशेष परिहार सांभाळण्याची जरूरी नाही. आरोग्यदायी दिनचर्या ठेवणे मात्र महत्वाचे आहे.