॥ पंचकर्म विज्ञान ॥ अक्षितर्पण

0
367
  •  वैदू भरत म. नाईक
    (कोलगाव)

अक्षितर्पण ः
नेत्रभागी स्नेहद्रव्याचे धारण करणे म्हणजेच नेत्रतर्पण किंवा अक्षितर्पण हा विधी होय.
उपयोगिता ः अक्षितर्पणाचा उपयोग विविध नेत्रगत विकारांमध्ये केला जातो. नेत्रशुष्कता, नेत्ररुक्षता, नेत्रस्तब्धता, नेत्रभिघात, दृष्टिमाध, नेत्रशोथ, इ. नेत्रविकारांमध्ये अक्षितर्पण केले जाते. विशेषतः वात व पित्त विकारांमध्ये हा उपक्रम योजिला जातो.

संभारसंग्रह ः
उपकरण – कापूर, उडदाचे मळलेले पिठ, मऊ टॉवेल, प्लास्टिक सिरींज, टॉटमध्ये गाऊन, शिर झाकण्याकरिता वस्त्र प्रावरण व आयकप. औषधी- नेत्रशुद्धीकरिता त्रिफलाक्वाथ, स्नेहद्रव्य. उदा. त्रिफला घृत.
प्रधानकर्म – (१) नेत्रशुद्धीकरिता प्लास्टिक सिरींज अथवा आयकॅपच्या सहाय्याने नेत्राचे त्रिफला धावन करून घ्यावे.
(२) माषकल्काची पाळी नेत्राभोवती सुमारे ३ सें.मी. इतकी उंच करून घ्यावी.
(३) रुग्णास नेत्र बंध करण्यास सांगून सुखोष्ण सिंद्धस्नेह त्या पाळीमध्ये भरावे.
(४) रुग्णास हळूहळू डोळ्यांची उघडझाप करावयास सांगावे.
पश्‍चात्‌कर्म ः रुग्णास त्याच अवस्थेत २० मिनिटे विश्रांती घेण्यास सांगावे.
परिहार ः रुग्णाने धूळ, धूर, प्रवास, प्रखर प्रकाश, रसायने, अतिथंड, अतिउष्ण, हवा व हाताने चोळणे टाळावे. नेत्र अधिक आरक्त वाटल्यास त्याप्रमाणे चिकित्सा करावी. वातज विकारांकरिता ४ मिनिटे, पित्तज विकारांकरिता ६ मिनिटे व स्वस्थांमध्ये ४ मिनिटे प्रतिदिन तर्पण करावे.
वातज ः विकारांमध्ये प्रतिदिन तर्पण करावे. पित्तज विकारांमध्ये एक दिवस आड तर कफज विकारांमध्ये दोन दिवस आड तर्पण करावे. काही वेळा तर्पण विधी क्रमवृद्ध रीतीने वेळ वाढवून वा कमी करून केला जातो.
मास्तिष्क्य
शिरोलेपन/तळम्/तलपोथिच्च्लि
संपूर्ण शिरःप्रदेशावर स्नेह, स्नेहभावित वनस्पतिज कल्क आदींचा प्रयोग करणे म्हणजे शिरोलेपन होय.

उपयोगिता – या क्रियेमुळे तक्रधारा क्रियेमध्ये मिळणारे फायदे अल्प प्रमाणात मिळतात. अवस्था भेदानुसार विविध दोषांनी निर्माण झालेल्या शिरोरोग, मस्तिष्क रोग, मानस रोग, सर्वांग वातज विकार यांमध्ये या क्रियेत लाभ होताना दिसतो. षस्टिकाशाली पिंडस्वेद करताना आमलकी कल्काचे मास्तिष्क्य करावे आणि ब्रह्मरंध्र्राच्या जागी शीत तैल भरून ठेवावे. षस्टिकाशाली पिंडस्वेदामधील संपूर्ण शरीरावरील उष्णसंस्काराचा शिरावर परिमाण होऊ नये म्हणून हे तेल धारण करणे महत्त्वाचे आहे.

संभारसंग्रह ः
उपकरण – एक स्वच्छ स्टेनलेस स्टीलचे पातेले, स्वच्छ टॉवेल, ट्रिटमेंट गाऊन, केळीची वा कमळाची पाने, मातीचे भांडे, आवळकठीचे चूर्ण.
पूर्वकर्म ः औषधी – तक्रधारा विधीमध्ये वर्णन केल्यानुसार १/२ लिटर ताक सिद्ध करून १९० ग्रॅम आवळकठी चूर्ण घालून रात्रभर मातीच्या भांड्यात ठेवावे. दुसर्‍या दिवशी पुन्हा चांगले एकत्र करून सरासरी मिश्रण तयार करावे. काही वैद्य यामध्ये मुस्ता चूर्ण एकत्र करतात. शक्यतो रुग्णाचे केस वस्तर्‍याने काढून पूर्ण मुंडन करावे. किमानपक्षी त्याचे केस बारीक करावे. शिरःस्नेहन व सर्व शरीरास अभ्यंग करावे. पेटीमध्ये सर्वांग बाष्पस्वेदन करावे.

प्रधानकर्म ः रुग्णाला ट्रिटमेंट गाऊन घालून पीठावर बसवावे. ही क्रिया प्रातःकालीच करावी. वर तयार केलेले आमलकीच्या मिश्रणाचा पूर्ण शिरःप्रदेशी १/२ ते ३/४ इंच जाडीचा लेप करावा. प्रथम कपाळावर व नंतर मागे लेप द्यावा. त्यावर केळीच्या पानाने लपेटावे. या लेपाचा कालावधी २० मिनिटांपासून १ तासापर्यंत क्रमाने रोज थोडा थोडा वाढवीत जावा. क्वचितप्रसंगी दीड तासपर्यंत हा लेप धारण केला जातो. अर्धातास झाल्यानंतर शिरोब्रह्माच्या जागी असलेला लेप काढून तिथे नवीन लेप लावावा. योग्य वेळ होताच ओलसर टॉवेलच्या सहाय्याने लेप पुसून काढावा. फडक्याने सर्व शिर स्वच्छ केल्यानंतर पुन्हा रुग्णाच्या शिरःप्रदेशी स्नेहन करावे. ही क्रिया सलग ७ ते १० दिवस करावी. प्रत्येक दिवशी नवीन कल्क वापरावा. वातघ्न शिरोरोगांमध्ये वातघ्न द्रव्यांनी सिद्ध खीर, मत्समांसाचा गरलेप, पित्तज शिरोरोगांमध्ये शीतल द्रव्यांनी युक्त लेप ही काही मास्तिष्क लेपांची उदाहरणे आहेत.

पश्‍चातकर्म ः सुखोष्ण जलाने स्नान करणे आवश्यक आहे.
परीक्षण ः तिसर्‍या व चौथ्या दिवशी रुग्णाच्या नाकावाटे प्रभूत जलवत् स्त्राव येताना दिसतो. हे शोधन झाल्याचे लक्षण समजले जाते.
व्याधींमध्ये उपयोग ः अर्धावभेद, अनिद्रा, नासादाह, हृद्रोग, शिरोरोग, मुळव्याधी, मस्तिष्क शोष, पक्षवध, अर्दित, कंपलात.
मानसव्याधी ः कोणत्याही ब्रेन सर्जरीनंतर आक्षेपक येत असतील तर अपस्मार, उन्माद, उष्माघात व रक्तभारवृद्धीमध्ये उपयुक्त.

हृदयबस्ती (हृदयतर्पण)
व्याख्या ः हृदयप्रदेशी बाहेरून स्नेहन वा औषधी द्रव्ये भरून ठेवणे म्हणजे हृदयबस्ती होय.
इथे शब्दशः बस्ती हा अर्थ लागू होत नाही. हृदयतर्पण हा शब्द अधिक संयुक्तिक ठरेल.
उपयोगिता ः शरीरातील कोणत्याही अवयवाच्या ठिकाणी बलवृद्धीकर अपेक्षित असेल तर त्या स्थानी तैल भरून ठेवले जाते. ही एक स्वस्त, सोपी व निर्धोक चिकित्सापद्धती आहे. श्‍वसन व रक्ताभिसरण सुधारणे हे कार्डिऍक प्लेक्ससचे कार्य आहे. तसेच रक्तवाहिन्यांमध्ये सूक्ष्म अडथळा आला असेल तर तो दूर करणे महत्त्वाचे ठरते. या दोन्ही हेतूंकरिता हृदयबस्ती करणे आवश्यक असते. किंबहुना शरीरात जेथे जेथे रक्ताभिसरणाला अडथळे येतात तेथे-तेथे अशा मार्गाने स्नेहपुरण करावे. ही एकांगस्नेहनाची क्रिया आहे. शरीराची त्वचा बराच काळ सुखोष्ण स्नेहाच्या संपर्कात राहिल्याने तत्‌संबंधी अवयवाला योग्य मात्रेत स्नेहन होते. यामुळे शमन, स्नेहन, बृहणपुरण, तर्पण, दोषशमन या क्रिया होतात.

अर्हता ः सहसा हृदयरोग्यांवर हृदयबस्ती चिकित्सा केली जाते. स्त्रियांमध्येसुद्धा हृदयबस्ती करता येते. हृदयध्वनीच्या जागेभोवती हे पुरण करावे. यासाठी सरफेस ऍनाटॉमीचा अभ्यास जरूर करावा.

संभासंग्रह ः (१) उडदाचे चिकटसर असे पाण्यात कालवलेले पीठ.
(२) सिद्ध तैल – जे औषधी सिद्ध तैल/धृत रुग्णामध्ये उपयोगात आणावयाचे आहे. उदा. बला तैल.
उपकरण सिहदता ः (१) तैलाकरिता पसरट पात्र, (२) तैल सुखोष्ण करण्यासाठी अग्नी, (३) तैल भरण्यासाठी व निष्कासित करण्याकरिता प्लास्टिक सिरिंज ५० सी.सी.ची.
मात्रा ः सर्वसाधारपणे ३० ते १०० मि.ली.पर्यंत. पुन्हा-पुन्हा हेच स्नेहद्रव्य वापरता येते.
काल ः प्रत्येक वेळी सुमारे २० ते ४५ मिनिटे ही क्रिया करावी. गरजेप्रमाणे सात दिवस ते एक महिन्यापर्यंत सलग ही चिकित्सा करावी. मध्ये थोडा खंड करून पुन्हा ही चिकित्सा करावी. गंभीर आजारी रुग्णामध्ये ही चिकित्सा करू नये.
पूर्वकर्म ः रुग्णाला उत्तानयन अवस्थेत निर्वस्त्र स्थितीत झोपवावे. भोजनानंतर ही क्रिया करू नये. अन्नकाली करणे उत्तम. पुरुषरुग्णाच्या छातीवर दाट केस असतील तर ते काढू टाकावेत.
आतुरपरीक्षा ः रुग्णाची नाडी, रक्तभार व इसीजी, इको- कार्डिओग्राफी, ट्रेस टेस्ट, डॉपलर स्टडी इ. चाचण्या चिकित्सेपूर्वी व नंतर कराव्या. त्याने रुग्णाला कोणता लाभ मिळाला आहे ते समजते.
प्रत्येक रुग्णामध्ये व्याधुनुरुप हृदयबस्तीचे स्थान निश्‍चित करावे.
हृदयबस्ति देताना सर्वप्रथम हृदयाची स्थान निश्‍चिती करण आवश्यक आहे. पुरुषांमध्ये हृदयाचे स्थान असे निश्‍चित करतात.
(१) ऊर्ध्वधारा (र्डीशिीळेी इेीवशी) ः वाम द्वितीय पशुकांतरीय खाताच्या/ (ङीं. डशलेपव खपींशीलेपीींरश्र डरिलश), उर्ध्व भागाच्या (णिशिी झेीींळेप), उसेस्थिच्या कडेपासून (चरीसळप ेष ढहश डींशीर्पीा) १ ते २ सें.मी. अंतरापासून त्याच खाताच्या (ठीं. डशलेपव खपींशीलेीींरश्र डशिलश) ऊर्ध्व भागापर्यंत दक्षिण बाजूस उरोस्थीच्या कडेपर्यंत (चरीसळप ेष ींहश डींशीर्पीा) बिघडू नये.

तेल सुमारे २ सें.मी. इतक्या पातळीपर्यंत भरावे.
पश्‍चात्‌कर्म ः सुखोष्ण जलाने स्थानिक स्वच्छता करावी. रुग्णास सुमारे दहा मिनिटे त्या स्थितीत विश्रांती घेण्यास सांगावी. एक तासानंतर लघु भोजन द्यावे.
लाभ – हृदयरोग जसे (१) खीलहरशाळल कशरीीं ऊळीशरीश, (२) ईंहशीेीलश्रशीेीळी, (३) चळींीर तरर्श्रींश झीेश्ररिीश, (४) चळींीरश्र डींशपेीळी, (५) अपसळपर झशलींेीळी, ज्यांच्या रक्तामध्ये विकृत मेदाचे प्रमाण अधिक आहे, म्हणजेच ज्यांच्या ङळळिव झीेषळश्रशी या सुस्थितीत नसून वाढलेल्या आहेत. नेमक्या भाषेत बोलावयाचे झाल्यास ङऊङ : कऊङ हे प्रमाण ४ः१ पेक्षा जास्त असेल तर हृदयबस्ती करणे लाभदायक ठरते.
कृच्छश्‍वासता, आयासे, श्‍वासवृद्धी, हृतशुल, कास, कफ निष्ठीव, हृत्स्पंद, संन्यास ही हृदयरोगामध्ये आढळणारी सामान्य लक्षणे आहेत.

या हृदयबस्तीमुळे चांगला लाभ होतो. मात्र संन्यास हे लक्षण प्रत्यक्ष असताना ही चिकित्सा देऊ नये. हृदयदौर्बल्यामुळे संन्यास हे लक्षण निर्माण होत असेल तर एरव्ही ही चिकित्सा द्यावी.

हृदयरोगामध्ये रक्तष्ठिवन, ज्वर निगिरण सकष्टता आदि आत्यंतिक लक्षणे निर्माण झाली असतील तर हृदयबस्ती चिकित्सा करू नये. रक्तभारवृद्धीमध्ये हृदय, बस्तीबरोबर शिरोबस्ती व शिरोधारा या चिकित्सांचा अधिक उपयोग होताना दिसतो. र्‍हुमॅटिक फीव्हर या व्याधीमध्ये हृदयबस्ती करू नये.

तर्पणांचे अन्य प्रकार
या पद्धतीने कटिकशेरूकांचे ठिकाणी व ग्रीवेच्या ठिकाणी पूरणार्थ स्नेहद्रव्ये वापरण्याची पद्धत आहे. त्यांना अनुक्रमे कटिबस्तिव ग्रीवाबस्तिअसे म्हटले जाते. नेत्राच्या ठिकाणी अशीच क्रिया केली जाते. त्यास अक्षितर्पण असे म्हमतात. कटिबस्ति, ग्रीवाबस्ति, अक्षितर्पण करण्याचीकृती हृदयबस्तिप्रमाणेच आहे. शिरोबस्तिसुद्धा साधारणातः या पद्धतीने केला जातो.

कटिबस्ति
व्याख्या – कटिस्थानी कशेरूकांच्या जागी काही काळ औषधी तैल भरून ठेवण्याच्या प्रक्रियेला कटिबस्ति असे म्हणतात.
उपयोगिता – कटिबस्तिचा उपयोग कंबरदुखी म्हणजेच कटिशुलावर होतो. त्याने कमरेच्या स्नायूंचे तसेच तेथील मांस व अस्थींचे पोषण होते. त्यामुळे ते सुदृढ होतात.
अर्हता – कमरेवर झालेला आघात, उभे राहून किंवा दुचाकीवरून केलेल प्रवास, अधिक काळ बसल्यामुळे झालेला कंबर दुखी, तसेच त्यामुळे मणक्यामध्ये झालेला बदल व झीज.

मलमूत्रांचे वेगधारण, योग्य व्यायामाचा अभाव, मूत्रदोष, स्त्रियांमध्ये वारंवार होणारा गर्भपात किंवा प्रसूती श्वेतस्त्राव (अंगावरून सफेद जाणे) पुरुषांमध्ये अति मैथुन किंवा वारंवार होणारे स्वप्नावस्थेतील वीर्यस्खलन, अस्थिंमधील सुषिरता किंवा झीज अशी काही कंबरदुखीची कारणे आहेत. यात कटिबस्तिचा वापर करावा.
मणक्यांच्या हाडांची झीज झाल्यामुळे किंवा दोन मणक्यांमधील कूर्चा सरकल्यामुळे मणक्यांच्या पोकळीतून बाहेर पडणारे नाडीतंतूदबले असह्य वेदना होणे, पायांमध्ये मुंग्या किंवा पाय बधीर होणे (गृघ्रसी) या सर्व अवस्थांमध्ये कटिबस्ति करवा.

संभार संग्रह –
द्रव्य – उडदाचे घट्ट मळलेले पीठ, औषधी तैल.
उदा. – महानारायण तैल कर्पास, ५० सी. सी. ची सिरींज.
पूर्वकर्म – रुग्णाला पोटावर म्हणजेच पालये झोपवले जाते. उडदाच्या पिठाची कणीक भिजवून कमरेच्या दुसर्‍या मणक्यां त्याचे २ इंच उंचीचे व ४ इंच व्यासाचे गोलाकार आले केले जाते.
प्रथानकर्म – औषधी द्रव्यांनी तयार केलेले तैल रुग्णाला सहन होील इतके गरम करून या आळ्यामध्ये भरले जाते.
थोड्‌ेया थोड्या वेळाने थंड झालेले तेल पुन्हा गरम करून आळ्यामध्ये भरले जाते. अशा प्रकारे आळ्यामधील तैल सतत सोसवले इतके गरम असेल (अंदाजे तपमान ४० डिग्री) याची काळजी घेतली जाते.

सतत ४५ ते ६० मिनिटे अशा प्रकारे कटिप्रदेशी स्वेदन मिळाल्यामुळे रुग्णाला आराम मिळतो. कारणांचा विचार करून ७, १४ किंवा २१ दिवस सतत किंवा एक दिवसाआड असा विष्ष्टि कोर्स ठरवला जातो. याचा निश्‍चित फायदा होतो.
व्याधींमध्ये लाभ – कटिशूलाच्या कारणांचा अभ्यास करून तैल निवडले जाते. कधी कधी खास तैल तयारही करावे लागते. शर्‍ीरातील सूक्ष्मतिसूक्ष्म छिद्रांमध्ये जाण्याची तैलाची क्षमता अतर्क्य आहे. त्यामुळे कमरेचे स्नायू आणि अस्थिंचे पोषण होऊन ते बळकट होतात.
कटिबस्ति देण्यापूर्वी त्या ठिकाणी स्थानिक नाडीस्वेद केल्यास अधिक फायदा होतो.
मेरुदंड बस्ति
कटिबस्ति प्रमाणे धिकाअधिक पृष्टवंशाचा भाग आच्छदित करून तर्पण, स्नेहन करणे म्हणजेच मेरुदंड बस्ति होय. यामध्ये ग्रीवेपासून कटिपर्यंतचा भाग व्यापला जाऊ शकतो.
पृष्ठवंशाच्या अधिकाधिक भागामध्ये जर विकृती असेल तर या क्रियेचा उपयोग केला जातो.

जानुबस्ति
रुग्णाला एक पीठावर पाय पसरून बसवून जानुसंधीचे भागी तर्पण करण्याचे प्रक्रियला जानुबस्ति अस म्हणतात. जानुबस्तिमध्ये जानुच्या भागी कटिबस्तिप्रमाणे औषधी तैल भरून ठेवले जाते.

यासाठी स्टेनलेस स्टीलचे गोलाकार भाग आदारासाठी ठेवावेत व त्याच्या भोबती उडदाचे घट्टपीठा मळून लावावे. यामुळे तैलबाहेर डून जात नाही.
जीींशेरीींहीळींळी, मार लागणे, संधिगतवात. आमवात अशा व्याधींसाठी जानुबस्ति हा उत्तम उपाय ठरतो. यामुळे संधिस्थित दोषांचे शमन व धाथूंचे तर्पण, बृहण होते.
संधींचे ठिकाणी अतिरिक्त, विकृत, द्रवसंचिती असेल तर मात्र जानुबस्ति देऊ नये.
(वैदू – भरत म. नाईक, कोलगांव, मोबा. ९६३७८५१५४/९४२१८९२५५१)