होंडा पंचायतीची इमारत धोकादायक

0
102

वाळपई (न. प्र.)
होंडा पंचायतीची इमारत धोकादायक स्थितीत असून पंचायतीने डागडुजीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. होंडा पंचायतीची इमारत बांधून वीस वर्षापेक्षा अधिक काळ झाला असून त्या इमारतीची डागडुजी न केल्याने इमारत मोडकळीस आली आहे.
इमारतीच्या तळ मजल्यावर दुकाने आहेत. इमारतीच्या तळमजल्यावरील दुकाने सोडल्यास दुसर्‍या व तिसर्‍या मजल्यावरील जागा अशीच पडली आहे. पंचायत त्यासाठी काहीही करताना दिसत नाही. त्यामुळे ती इमारत धोकादायक बनत चालली आहे.
आर्थिक दृष्ट्या सक्षम
होंडा पंचायत आर्थिकदृष्ट्या सक्षम असून पंचायत क्षेत्रात औद्योगिक वसाहतीबरोबर, पेट्रोल पंप व खाण कंपन्या येत आहेत. त्यामुळे पंचायतीला निधीची समस्या नाही, पण पंचायत इमारत दुरुस्त का करीत नाही, हा प्रश्न नागरिकांना पडत आहे. इमारत दुरुस्त करीत असताना इमारतीत जी रहिवासी जागा आहे त्याठिकाणी चांगले सभागृह बांधावे, अशी मागणी होत आहे.