>> आंतर प्रसारमाध्यम नाईन ए साईड फुटबॉल स्पर्धा
हेराल्डने प्रुडंट मीडिया संघाचा एकतर्फी लढतीत ४-० असा धुव्वा उडवून आंतर प्रसारमाध्यम नाईन ए साईड फुटबॉल स्पर्धा जिंकली. गोवा क्रीडा पत्रकार संघटनेने गोवा फुटबॉल विकास परिषदेच्या संयुक्त विद्यमाने व गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन केले होते. बांबोळी येथील ऍथलेटिक स्टेडियमवर आयोजित या चार दिवसीय स्पर्धेच्या कालच्या अंतिम सामन्यात हेराल्डकडून ऍलन डीक्रुझ याने ३ गोल केले.
अनिल कालेकर याने एक गोल करत त्याला चांगली साथ दिली. यानंतर झालेल्या प्रदर्शनीय लढतीत जीएफडीसी संघाने गोवा श्रमिक पत्रकार संघटनेचा (गुज) २-१ असा पराभव केला. बंदर कप्तान मंत्री व प्रमुख पाहुणे मायकल लोबो, जीएफडीसीचे सदस्य सचिव आलेक्सो दा कॉस्टा यांनी या लढतीत जीएफडीसी संघाकडून सहभाग नोंदविला. जीएफडीसीकडून शशांक अश्वेकर व फ्रेंकलिन रॉंकोन यांनी गोल केले तर गुजचा एकमेव गोल किशोर कामतने केला. बक्षीस वितरण समारंभाला बोलताना मायकल लोबो यांनी तंदुरुस्तीचे महत्त्व विषद करताना वेळात वेळ काढून किमान व्यायाम प्रत्येकाला आवश्यक असल्याचे सांगितले.
फुटबॉलसारख्या खेळामुळे तंदुरुस्ती राखण्यास मदत होत असून आठवड्याला किमान एकदा तरी हा खेळ खेळण्याचा आपला मानस असल्याचे ते म्हणाले.
विजेत्या व उपविजेत्या संघांना रोख बक्षिसे व झळाळता करंडक देण्यात आला. स्पर्धेसाठीची रोख बक्षिसे चर्चिल आलेमाव व त्रिवेश आजगावकर यांनी पुरस्कृत केली होती.
वैयक्तिक बक्षिसे ः सर्वोत्तम गोलरक्षक ः जुझे फर्नांडिस (हेराल्ड), सर्वोत्तम बचावपटू ः राजेश नाईक (प्रुडंट), सर्वोत्तम मध्यरक्षकः साईदीप कदम (प्रुडंट),