हेपटायटिसवरील संशोधनासाठी तीन संशोधकांना नोबेल

0
257

हेपटायटिस सी विषाणूवरील औषधनिर्मितीसाठी हार्वे जे अल्टर, मायकल ह्युटन आणि चार्ल्स एमराईस यांना वैद्यकशास्त्रासाठीचे नोबेल पारितोषित जाहीर झाले आहे. हार्वे व चार्ल्स हे अमेरिकी वैज्ञानिक आहेत, तर मायकल ह्यूटन हे ब्रिटीश संशोधक आहेत. नोबेल समितीचे अध्यक्ष थॉमस पर्लमन यांनी विजेत्यांच्या नावांची घोषणा स्टॉकहोममध्ये केली.
जगात हेपटायटिसचे ७ कोटी रुग्ण असून दरवर्षी चार लाख लोक त्याने दगावतात असा जागतिक आरोग्य संघटनेचा अंदाज आहे.