गेल्या काही काळापासून इस्रायलने अनेक देशांवर हल्ले केले आहे. अशातच आता इस्रायलवर ड्रोन हल्ला करण्यात आला आहे. हुथी बंडखोरांनी येमेनमधील आपल्या नियंत्रणाखालील भागातून इस्रायलवर ड्रोन हल्ले केले आहेत. मात्र इस्रायलने हे हल्ले रोखले असल्याचे म्हटले आहे.
हुथी बंडखोरांनी हल्ले केल्यानंतर इजिप्तच्या सीमेजवळील इस्रायली भागात सायरन वाजत होते. आयडीएफने येमेनमधून इस्रायलवर हल्ला झाल्याचे कबूल केले आहे. आयडीएफने सांगितले की, इस्रायली हवाई दलाने येमेनमधून इस्रायलवर डागलेले तीन द्रोन पाडले, त्यापैकी दोन द्रोन इस्रायली हद्दीत प्रवेश करण्यापूर्वी नष्ट करण्यात आले होते. त्यामुळे मोठे नुकसान टळले आहे.
याआधी इस्रायली संरक्षण दलांने 28 ऑगस्टला येमेनची हुथी-नियंत्रित राजधानी साना येथे हल्ला केला होता. यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी, यांच्यासह 9 मंत्री आणि दोन अधिकारी ठार झाले होते.
22 ऑगस्टला क्लस्टर शस्त्रांचा वापर करून हुथींनी इस्रायलवर द्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ला केला होता. याला प्रत्युत्तर देताना आयडीएफने हे हल्ले केले होते.