ही आपली शेवटची निवडणूक : आलेमाव

0
14

आपण वयाची ७२ वर्षे पूर्ण केली असून, ही आपली शेवटची निवडणूक आहे. आपल्या हितचिंतकांनी आपल्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून आपणास आमदार बनण्याची संधी द्यावी, असे भावनिक आवाहन तृणमूलचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी काल वार्का येथील पत्रकार परिषदेत केले.

तृणमूल हा पश्‍चिम बंगालमधील पक्ष असला, तरी गोव्यासाठी चांगल्या योजना घेऊन येत आहे. भविष्यात गोव्यात हाच पक्ष सत्तेवर येईल. मोदी, शहा यांना टक्कर देण्याची ताकद ममता बॅनर्जींमध्ये आहे. भाजपला सत्तेतून हटवण्यासाठी हाच पक्ष एकमेव उपाय आहे, असे आलेमाव यांनी सांगितले.