हिमाचलमध्ये मंत्रिमंडळ विस्तार

0
6

हिमाचल प्रदेशमधील कॉंग्रेस सरकारच्या मंत्रिमंडळाचा एक महिन्यानंतर विस्तार झाला. काल ७ मंत्र्यांना शपथ देण्यात आली. कर्नल धनीराम शांडिल यांना सर्वप्रथम शपथ देण्यात आली. यानंतर आमदार चंद्रकुमार, हर्षवर्धन, जगतसिंह नेगी, रोहित ठाकूर, अनिरुद्ध सिंह आणि विक्रमादित्य सिंह यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या मंत्रिमंडळात शिमला जिल्ह्यातून तीन आमदार मंत्री झाले आहेत. तर ५ जिल्ह्यांना मंत्रिपदे मिळाली नाहीत.

मंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी मंत्री होऊ न शकलेल्या ६ आमदारांना मुख्यमंत्री सुख्यू यांनी मुख्य संसदीय सचिवपदाची शपथ दिली.
हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल दि. ९ डिसेंबर रोजी लागला होता. त्याच दिवशी कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. दि. १० डिसेंबर रोजी सुखविंदर सुख्यू यांची मुख्यमंत्री आणि मुकेश अग्निहोत्री यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड झाली. त्यानतंर दुसर्‍याच दिवशी म्हणजे ११ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र त्यानतंर एक महिन्याचा कालावधी लोटल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे.