पक्षश्रेष्ठींवर नाराज होऊन कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देणारे गुजरातमधील युवा नेते हार्दिक पटेल यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला. कॉंग्रेसला रामराम ठोकल्यावर पटेल भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अखेर त्या चर्चा खर्या ठरल्या. गुजरातमधील गांधीनगर येथील भाजपच्या मुख्यालयात त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी त्यांना पक्षाचे सदस्यत्व दिले. यावेळी गुजरातचे माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्यासह भाजपचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर हार्दिक पटेलांनी एक ट्विट केले. देश आणि राज्याच्या हिताचे काम आपण करणार असून, एका नवीन राजकीय प्रवासाला सुरुवात करत आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘छोटा शिपाई’ बनून काम करणार असल्याचेही पटेल म्हणाले.