हस्तकला महामंडळाच्या  वस्तू ऑनलाइन मिळणार

0
154

गोवा हस्तकला विकास महामंडळाच्या दालनातील वस्तू ग्राहकांना ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्याची योजना असून त्यासाठी राज्यातील दोन कंपन्यांनी प्रस्ताव दिल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष लवू मामलेदार यांनी दिली. ऑनलाइन पध्दतीने वस्तूंची विक्री केल्यास ग्राहकांची चांगली सोय होऊ शकेल, असे ते म्हणाले. पुढील आठवड्यात या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी बैठक होईल, असे मामलेदार यांनी सांगितले. जानेवारी महिन्यात धारबांदोडा व उसगाव येथे मिळून दोन लघू मांडचे आयोजन केले असून त्यामुळे ग्रामीण भागातील कारागिरांना अधिक वाव मिळू शकेल, असे मामलेदार यांनी सांगितले.