हनुमान जन्मोत्सवाच्या मिरवणुकीवर दगडफेक

0
28

>> कर्नाटक, दिल्लीनंतर आंध्र प्रदेशातही गालबोट

>> दिल्लीत २० संशयितांना अटक

शनिवारी हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी देशातील अनेक राज्यांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या. दिल्ली, कर्नाटक व आंध्र प्रदेशमध्ये हनुमान जन्मोत्सवाच्या मिरवणुकीवर समाजकंटकांनी दगडफेक करण्याच्या घटना घडल्या. या प्रकरणी कारवाई करत दिल्लीत पोलिसांनी २० संशयितांना अटक केली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट लागू करण्यात आला असून हुबळीमध्ये १४४ कलम लागू केले आहे. कर्नाटकात समाजकंटकांनी रुग्णालयाला लक्ष्य करत दगडफेक केली होती.

जुन्या हुबळी पोलीस स्थानकाबाहेर जमा झालेल्या जमावाने अचानक दगडङ्गेक सुरू केली. त्यामुळे पोलिसांनी लाठीमार केला. तसेच जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या.

रुग्णालयालाही लक्ष्य
व्हॉट्सऍपवर आक्षेपार्ह स्टेटस असलेल्या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी करत जमावाने पोलीस स्थानकाबाहेर हिंसक निदर्शने केली. आंदोलकांनी जवळच्या हनुमान मंदिर आणि रुग्णालयावर दगडङ्गेक केली. संपूर्ण शहरात कलम १४४ लागू करण्यात आले असून परिस्थिती नियंत्रणात आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

दिल्लीत राडा, जाळपोळ
दिल्लीतील जहांगीरपुरी येथे हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत राडा झाला. हनुमान जन्मोत्सवाच्या मिरवणुकीत लोकांवर दगडङ्गेक आणि तुरळक जाळपोळ झाल्याची चर्चा आहे. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनास्थळी अतिरिक्त ङ्गौजङ्गाटाही तैनात करण्यात आला आहे. कुशल सिनेमाजवळ संध्याकाळी साडेचार ते साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. दिल्ली पोलिसांचा स्पेशल सेल आणि गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करणार आहे. हिंसाचाराच्या तपासासाठी १० पथके तयार करण्यात आली आहेत.

राजधानी दिल्लीतील जहांगीरपुरी परिसरात संध्याकाळी उशिरा हा हिंसाचार सुरू झाला. अचानक काही लोकांनी मिरवणुकीवर दगडङ्गेक केली. यानंतर गोंधळ झाला, त्यात हल्लेखोरांनी सुमारे ५० मिनिटे गोंधळ घातला. दगडङ्गेक केली, तलवारी उगारल्या. जाळपोळ केल्यानंतर दोन्ही बाजूंच्या लोकांमध्ये घोषणाबाजी करण्यात आली.

२० संशयितांना अटक
दिल्ली हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत २० जणांना अटक केली आहे. यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश असून पोलिसांनी तीन पिस्तूलांसह पाच तलवारीही जप्त केल्या आहेत. या हिंसाचार प्रकरणी नोंदवण्यात आलेल्या एङ्गआयआरनुसार, ही मिरवणूक जहांगीरपूरच्या सी ब्लॉकमधील जामा मशिदीजवळ पोहोचली त्यावेळी अन्सार नावाची एक व्यक्ती चार-पाच साथीदारांसह मिरवणुकीत सामील लोकांसोबत वाद घालू लागला. यानंतर हा वाद वाढत गेला आणि दगडङ्गेक झाली. यावेळी मोठ्या प्रमाणात जाळपोळही करण्यात आली.

पोलिसांनी या हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत २० जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या २० आरोपींपैकी चार आरोपी एकाच कुटुंबातील आहेत. शोभा यात्रेदरम्यान गोळीबार करणार्‍या अस्लम यालाही पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.

केजरीवालांचा केंद्रावर आरोप
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जहांगीरपुरीमध्ये झालेल्या हिंसाचारावर लोकांना शांतता राखण्याचं आवाहन करत केंद्रावर आरोप केले आहेत. केजरीवाल यांनी, दिल्लीची सुरक्षा ही केंद्राची जबाबदारी असल्याचे म्हटले आहे,
यूपीमध्ये हाय अलर्ट
दिल्लीतील जहांगीरपुरी भागात झालेल्या गोंधळाच्या घटनेमुळे यूपीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. धार्मिकदृष्ट्‌या संवेदनशील ठिकाणे आणि धार्मिक स्थळांभोवती गस्त वाढवण्यात आली आहे. आज अयोध्येत ८४ कोशी यात्रा सुरू होणार आहे. या प्रवासाबाबत स्थानिक पोलीस प्रशासनाला विशेष दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हुबळी येथे पोलीस स्थानकावर दगडफेक
कर्नाटक राज्यात जमावाने दगडङ्गेक केल्याची घटना समोर आली आहे. कर्नाटकातील हुबळी येथील जुन्या हुबळी पोलीस स्थानकावर जमावाने दगडङ्गेक केली. यामध्ये एका निरीक्षकासह ४ पोलीस जखमी झाले आहेत. यामुळे संपूर्ण शहरात कलम १४४ लागू करण्यात आले असून परिस्थिती नियंत्रणात आहे.

राजधानीत अलर्ट
दंगलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संपूर्ण दिल्लीत अलर्ट जारी केला असून, संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. संवेदनशील ठिकाणी पोलिसांनी नागरी संरक्षणाच्या बैठकाही बोलावल्या आहेत. परिस्थिती आता नियंत्रणात असून गोंधळ घालणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.

आंध्र प्रदेशमध्ये हिंसाचार

आंध्र प्रदेशातही हनुमान जन्मोत्सव सणाला समाजकंटकांकडून गालबोट लागले. हनुमान जयंतीची निघालेली मिरवणूक एका मशिदीजवळ आली असता काही समाजकंटकांनी मिरवणुकीवर दगडङ्गेक केली. त्यातून दोन गटात दगडङ्गेकीचा संघर्ष झाला. पण सुदैवाने घटनास्थळी त्वरित पोलीस दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला. संबंधित घटनेत १५ जण किरकोळ जखमी झाले असून पोलिसांनी मध्यस्थी करुन दोन्ही बाजूंना शांत करत प्रकरण हाताळले. त्यामुळे संबंधित परिसरात आता पूर्वीसारखी शांतता आहे. ही घटना आंध्र प्रदेशच्या कुरनूल जिल्ह्यातील होलागुंडा गावात घडली.