हत्या केलेल्यांवर कडक कारवाई हवी ः इजिदोर

0
127

वाघांची हत्या केलेल्यांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे, असे वनविकास महामंडळाचे अध्यक्ष व उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी काल सांगितले. वाघ हे नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने त्यांची हत्या किंवा शिकार केली जाणार नाही याकडे वन खात्याने खास लक्ष देण्याची गरज असल्याचे फर्नांडिस म्हणाले.
वाघाचे दात व नखे तसेच कातडी व अन्य अवयवांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी असल्याने त्यांच्या तस्करीसाठी वाघांची शिकार होत असल्याचे सांगून अशा तस्करांवर वनखात्याने नजर ठेवायला हवी, असे ते म्हणाले.

गोव्यात ठिकठिकाणी घनदाट अशा जंगलात काही कुटुंबे राहत असून उपजीवीकेसाठी शेती व्यवसाय करीत आहेत. अशा लोकांचे सरकारने वन क्षेत्राबाहेर पुनर्वसन करण्याची गरज असल्याचे फर्नांडिस म्हणाले. काणकोणमधील वनक्षेत्रात राहणार्‍या काही कुटुंबांचे वनक्षेत्राबाहेर पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव आपण दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना दिला होता, असेही फर्नांडिस म्हणाले.