हणजूण येथे शॅकला आग, १० लाख रुपयांचे नुकसान

0
36

हणजूण येथील ब्ल्यू लाईन हॉस्पीलिटी या शॅकला काल दिवाळीच्या दिवशी मध्यरात्री आग लागून हा शॅक पूर्णतः जळून खाक झाला. यात शॅकच्या मालकाला दहा लाखांचे नुकसान झाले.

याबाबत म्हापसा अग्निशमन दलाला या घटनेची माहिती मिळताच दलाचे अधिकारी अशोक परब, जवान देवेंद्र नाईक, परेश मांद्रेकर, नितीन मयेकर, सुरज कारापुरकर, अर्जुन धावस्कर, स्वप्नेश कळंगुटकर यांनी पाण्याचे दोन बंब नेऊन आग विझवली. परंतु तोपर्यंत या शॅकमध्ये असलेले लाकडी खुर्च्या, टेबल, या बरोबरच इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि विजेचे सामान जळून खाक झाले.

सदरचा शेक हा हणजूण फ्ली मार्केटच्या जवळील समुद्र किनार्‍याकडे होता. त्याला आग कशी लागली याचे कारण समजू शकले नसल्याची माहिती म्हापसा अग्निशामक दलाने दिली.