हणजुण येथे अमली पदार्थ जप्त

0
99

अमली पदार्थ विरोधी विभागाच्या पोलिसानी हणजुण येथे ‘अमुल शॉप’ या गाड्यावर छापा मारून आयएस्‌डी हे अमली पदार्थ जप्त केले. २६ ग्राम एवढे हे अमली पदार्थ असून त्यांची किंमत एक लाख वीस हजार रु. एवढी आहे. या प्रकरणी पोलिसानी संशयित आरोपी रॉकी मान्युएल फर्नांडिस याला अटक केली आहे. रॉकी फर्नांडिस हा हणजुण येथील असून त्याला ९ दिवसांचा न्यायालयीन कोठडीचा रिमांड देण्यात आलेला आहे. अमली पदार्थ विरोधी विभागाचे उपनिरीक्षक दिनेश गडेकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिसानी ही कारवाई केली.