वियेगश-वाडा, हणजूण येथील एका खाजगी गेस्टहाऊसच्या मालक शिरीन मोदी (६५) यांच्यावर कामगाराकडून रविवारी सकाळी प्राणघातक हल्ला झाला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या श्रीमती शिरीन यांना कुटुंबियांकडून इस्पितळात नेले जात असतांना त्यांचे वाटेतच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, शिरीन यांच्यावर हल्ला करून पळ काढणार्या प्रफुल्ला जना (ओडीसा) याचा घटनास्थळापासून शंभर मीटर अंतरावर कोसळला असता त्याचाही जागीच मृत्यू झाला.
हणजूण पोलिस तसेच उत्तर गोव्याचे अधिक्षक उत्कट प्रसन्न यांनी दिलेल्या माहितीनुसार, खुनाची ही घटना रविवारी सकाळी ११ ते ११:३० च्या दरम्यान घडली. शिरीन मोदी या येथील वियेगश वाड्यात गेली वीस वर्षे घराशेजारीच त्या विदेशी पर्यटकांसाठी गेस्ट हाऊस चालवत होत्या. रविवारी सकाळी त्यांच्याकडे गेली तीन वर्षे माळी म्हणून काम करणार्या प्रफुल्ला जना (६८ – ओडीसा) यांच्याशी श्रीमती मोदी यांची कामावरून बाचाबाची झाली असतां प्रफुल्ला याने जवळच्या शेडमधील लोखंडी पाईप मोदी यांच्या डोक्यात हाणला. यावेळी भांडणाचा गोंधळ ऐकून त्याजागी धावत आलेल्या मोलकरणीला जना यांने ढकलून देत कंपाऊंडवरून उडी घेतली व व घटनास्थळावरुन पळ काढला. दरम्यान, या हल्ल्यात जबर जखमी झालेल्या शिरीन मोदी यांना कुटुंबियांकडून जवळच्या इस्पितळात उपचारासाठी नेण्यात येत असतां वाटेतच त्यांचे निधन झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
जखमी स्थितीत रस्त्यावर पडलेल्या जना याला १०८ रुग्णवाहिकेने उपचारासाठी नेताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला.