Home Featured हडफड्यातील नाईट क्लबपाडण्याचा मार्ग मोकळा

हडफड्यातील नाईट क्लबपाडण्याचा मार्ग मोकळा

0

हडफडे येथील मिठागरातील बेकायदा बर्च बाय रोमियो लेन हा नाईटक्लब पाडण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. अतिरिक्त पंचायत संचालक -1 यांनी बर्च या नाईटक्बलची मिठागरातील बांधकामे पाडण्याच्या हडफडे ग्रामपंचायतीच्या आदेशाला आव्हान देणारा अर्ज फेटाळून लावला आहे.
बर्च या नाईटक्लबला 6 डिसेंबरला लागलेल्या आगीत 25 जणांचा बळी गेला आहे.

हडफडे नागवा पंचायतीने बर्च हा नाईटक्लबची बेकायदा बांधकामे पाडण्यासाठी 20 एप्रिल 2024 रोजी नोटीस जारी केली होती. बर्चच्या व्यवस्थापनाने पंचायतीच्या नोटीसला अतिरिक्त पंचायत संचालक -1 यांच्यासमोर आव्हान अर्ज दाखल केला होता. बर्च या नाईटक्लबला आग लागल्यानंतर चौकशीसाठी नियुक्त उत्तर गोवा न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केलेल्या चौकशीत बर्च हा नाईटक्लब बेकायदा असल्याचे स्पष्ट झाले आहे.