‘स्वाइन फ्लू’चा राज्यात दुसरा बळी

0
95

‘स्वाइन फ्लू’ची लागण झालेल्या २५ रुग्णांपैकी यापूर्वी एक रुग्ण दगावला होता. काल सांगे येथील ७९ वर्षांच्या महिलेचाही मृत्यू झाला असून त्यामुळे या रोगाने राज्यात बळी गेलेल्यांची संख्या दोन झाली आहे. अन्य रुग्णांवर खासगी तसेच सरकारी इस्पितळांमध्ये उपचार चालू आहेत. वरील रोगाची लागण झालेले बहुतेक रुग्ण गोव्याबाहेर जाऊन आले होते. तेथेच त्यांना या रोगाची लागण झाली असावी. गरमी वाढल्यास या रोगाचे विषाणू नष्ट होतील, असे संबंधित डॉक्टारांचे म्हणणे आहे. जाहिरातीच्या माध्यमातून सरकार या रोगाच्या बाबतीत जनजागृती करीत आहे. रोगाची लक्षणे दिसून आल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे संपर्क करावा, असे आवाहन साथीच्या रोग विभागाचे डॉक्टर उत्कर्ष बेतोडकर यांनी केले आहे.