राज्यातील नगरपालिका आणि पंचायत क्षेत्रातील आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोवा अभियानाला येत्या ३ जुलैपासून पुन्हा सुरुवात केली जाणार आहे.
राज्यातील कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेने हाहाकार माजवल्यानंतर राज्य सरकारने नगरपालिका आणि पंचायत क्षेत्रातील आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोवा हे अभियान स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आता राज्यातील नवे कोरोना रुग्ण आणि बळींच्या संख्येत घट होत असल्याने हे अभियान पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित स्वयंपूर्ण मित्र, तालुका नोडल अधिकारी, नोडल अधिकारी, संबंधित खात्याच्या अधिकार्यांनी नव्याने सुरू करण्यात येणार्या अभियानाची नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सरकारने १९१ सरकारी अधिकारी स्वयंपूर्ण मित्र म्हणून नियुक्त केले आहेत. हे स्वयंपूर्ण मित्र प्रत्येक पंचायतीला आत्मनिर्भर बनवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.