स्मृती इराणी यांना कोरोनाची बाधा

0
252

बिहारमध्ये प्रचारात व्यस्त असलेल्या केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची बाधा झाली आहे. स्मृती इराणी यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. त्याचबरोबर संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहनही इराणी यांनी केले आहे. गेल्या आठवड्यात स्मृती इराणी बिहारच्या प्रचाराच्या रणधुमाळीत व्यस्त होत्या. दहापेक्षा अधिक प्रचारसभांना त्यांनी संबोधित केले होते. दरम्यान, काल त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे इराणी यांंनी मला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले असून जे लोक माझ्या संपर्कात आलेले आहेत, त्यांनी स्वतःची करोना चाचणी आवश्य करून घ्यावी, असे आवाहन केले आहे. स्मृती इराणी यांनी मंगळवारीच गोपालगंज येथील प्रचार सभेला संबोधित केले होते.