केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी इफ्फी २०१७ च्या तयारीचा आढावा काल घेतला.
इफ्फी तयारी आढावा बैठकीत डीएफएफ आणि एनडीएफसी अधिकार्यांनी सहभाग घेतला. या बैठकीच्या पूर्वी केंद्रीय मंत्री इराणी यांनी गोवा कला अकादमीला भेट देऊन सविस्तर माहिती जाणून घेतली.
यंदाचा इफ्फी २०१७ नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेण्यात येणार आहे. महोत्सव आणखी आकर्षक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नवीन फिल्मचा जास्त समावेश करण्याबाबत विचार सुरू आहे, अशी माहिती गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र तालक यांनी दिली.