‘स्मार्ट सिटी’वर पणजीत उद्यापासून राष्ट्रीय परिषद

0
77

>>राज्यांसह केंद्राच्या अधिकार्‍यांचा सहभाग

 

‘डिजिटल भारत युगातील स्मार्ट शहरे’ या विषयावरील एका राष्ट्रीय परिषदेचे उद्या १० व परवा ११ जून रोजी पणजीत आयोजन करण्यात आले असून ही परिषद मेरिएट रिसॉर्ट हॉटेलात होणार असल्याचे आमदार सिध्दार्थ कुंकळ्येकर यांनी काल येथे पत्रकार परिषदेत सांगितले. या परिषदेत ‘स्मार्ट सिटी’, ‘डिजीटल इंडिया’, ‘मेक इन इंडिया’ ‘स्वच्छ भारत’, ‘अमृत’ व अन्य विषयांवर चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हे या परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून हजर असतील. तर उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा हे सन्माननीय पाहुणे असतील.
भारत सरकारचा डिजीटल इंडिया कार्यक्रमाद्वारे भारतात क्रांती घडवून आणण्याच्या योजनेवर या परिषदेत भर देण्यात येणार आहे. स्मार्ट आरोग्यसेवा, स्मार्ट शिक्षण, स्मार्ट शहरे व पुढची वाटचाल, भारताला एक स्मार्ट राष्ट्र बनवणे. संधी व आव्हाने, स्मार्ट शहरातील सायबर सुरक्षा, अमृत व स्वच्छ भारत यांचा स्मार्ट शहरात अंतर्भाव करणे अशा विविध विषयांवर या परिषदेत चर्चा होणार असल्याचे कुंकळ्येकर यांनी स्पष्ट केले.
शहर विकास मंत्रालय, भारत सरकार, त्याशिवाय गोवा सरकारची आरोग्य, शिक्षण, वीत्त खाती तसेच सचिव व नगरपालिका महामंडळे, उद्योग क्षेत्रातील व्यक्ती तसेच तेेलंगाना राज्याचे उपमुख्यमंत्री, पंजाब व कर्नाटकचे मुख्य सचिव, वरिष्ठ अधिकारी व प्रस्तावित सर्व स्मार्ट शहरांचे आयुक्त या परिषदेला हजर राहणार असल्याचे कुंकळ्येकर यांनी स्पष्ट केले.