‘स्मार्ट’ खड्ड्यात आणखी एकाचा बळी

0
7

मळा-पणजेी येथे स्मार्ट सिटीतर्फे गटाराच्या बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून महादेव चोडणकर (65 वर्षे) यांचे निधन काल झाले. खड्डा खोदण्यात आलेल्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात न आल्याने ही घटना घडली. स्मार्ट सिटीच्या बेशिस्तपणे सुरू असलेल्या कामामुळे आणखी एकाचा नाहक बळी गेला आहे. मागील आठवड्यात सांतइनेज-पणजी येथे एका घरासमोर खोदण्यात आलेल्या चरात पडून एक ज्येष्ठ महिलेचा हात फॅक्चर झाला होता, तर त्याआधी 1 जानेवारीला पहाटेच्या वेळी मळा येथे स्मार्ट सिटीच्या कामांसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एका युवकाचा बळी गेला होता.