स्फोटके बनवणाऱ्या कंपनीत स्फोट, 9 जण मृत्युमुखी

0
36

नागपूर -अमरावती रस्त्यावरील बाजार गाव येथे असलेल्या सोलार एक्सप्लोसिव्ह या डेटोनेटर आणि इतर स्फोटके बनवणाऱ्या कंपनीत काल रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास स्फोट झाला. या दुर्घटनेत नऊ जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये 6 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. या स्फोटात अनेक मजूरही गंभीररित्या जखमी झाले आहेत.
अद्यापही अनेकजण कंपनीत अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बाजार गाव येथे ही कंपनी असून निर्माण झालेले स्फोटक पॅकिंग करण्याचे काम सुरू असताना हा स्फोट झाला. त्यामध्ये 9 जण होरपळून मृत्युमुखी पडले.