स्पोर्टिंग-साळगावकर आज प्रतिष्ठेसाठी लढत

0
69

रेलेगेशन झोनमधून बाहेर पडलेल्या साळगावकर फुटबॉल क्लब आणि स्पोर्टिंग क्लब दी गोवा यांच्यात आज हीरो आय-लीग स्पर्धेच्या शेवटच्या फेरीचा सामना फातोर्ड्याच्या वास्कोच्या टिळक मैदानावर होणार आहे.
फर्स्ट लेगमध्ये फातोर्डा स्टेयिडमवर दोन्ही संघात झालेला सामना १-१ अशा बरोबरीत संपला होता. आता पुन्हा एकदा या दोन्ही संघात आपली प्रतिष्ठा व वर्चस्व राखण्यासाठी सामना रंगणार आहे. साळगावकर फुटबॉल क्लबचे सध्या १५ सामन्यातून १६ गुण झाले असून त्यांनी विजय मिळविल्यास ते १९ गुणांसह स्पोर्टिंग क्लबशी बरोबरी करतील. त्यामुळे त्यांना चौथ्या स्थानावर झेप घेण्याची संधी असेल.
सामन्याच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना स्पोर्टिंगचे मुख्य प्रशिक्षक मॅथ्यूज कॉस्ता म्हणाले की, आम्हाला तिसरे स्थान गाठणे अश्यक आहे. त्यामुळे आम्ही आमचे चौथे स्थान राखण्यासाठी प्रयत्नशील असू. काही सामन्यांत आम्हाला ‘पूअर फिंनिशिंग’चा फटका बसला आणि महत्त्वपूर्ण गुण गमावले व काही सामन्यांत बरोबरींवर समाधान मानावे लागले. त्यामुळे आम्हाला अव्वल तीन संघात स्थान मिळविण्याची संधी गमवावी लागली. आता आम्हाला आमचे चौथे स्थान राखावे लागले. त्यामुळे आगामी फेडरेशन चषक स्पर्धेसाठी खेळाडूंचा आत्मविश्वास दुणावण्यास मदत होईल, असे मॅथ्यूज
म्हणाले.
दुखापतीमुळे स्पोर्टिंगला त्यांचा कर्णधार ओडाफा ओकोलीविना खेळावे लागण्याची शक्यता आहे. तर मेहराजुद्दीन वाडूलाही गेल्या सामन्यात लाल कार्ड मिळाले असल्याने खेळता येणार नाही.
दरम्यान, साळगावकर फुटबॉल क्लबचे मुख्य प्रशिक्षक संतोष कश्यप यांनी यावेळी बोलताना सांगितले की, आम्ही येथे दोन कठीण लढती खेळून आलेलो आहेत. आम्ही ऐझवाल एफसीविरुद्ध चांगला खेळ केला. परंतु बंगळुरूविरुद्ध आमची योजना यशस्वी होऊ शकली नाही. हा वेगळा सामना असेल. आम्ही आम्हाला निश्‍चितच तघरच्या मैदानावर खेळण्याचा लाभ मिळेल. हा आय-लीगमधील शेवटचा सामना असल्याने निश्‍चित विजयामुळे आम्हाला चौथ्या स्थानावर झेप घेण्याची संधी आहे.