जर्मनीच्या चान्सलर अंजेला मार्केल यांच्या उजव्या विचारसरणीच्या ख्रिश्चन डेमॉक्रेटिक युनियन पक्षाला थोडक्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. जर्मनीचा डावा पक्ष असलेल्या सोशल डेमॉक्रेटिक पार्टी ऑफ जर्मनीला सर्वाधिक मते मिळाली आहेत. मात्र कुणालाही बहुमत न मिळाल्याने जर्मनीत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जर्मनीत दोन किंवा त्यापेक्षा अधिक पक्षांना एकत्र येऊन युती सरकार स्थापन करावे लागणार आहे. जर्मनीच्या संसदेत एकूण ७३५ सदस्य असून, त्यापैकी या निवडणुकीत एसपीडीला २०६ जागा, सीडीयू/सीएसयूला १९६ जागा, ग्रीन पार्टीला ११८ जागा आणि एफडीपीला ९२ जागा मिळाल्या आहेत.