स्त्रीचे व्यक्तित्व

0
1196

– नीता नाईक
प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिमत्व हे वेगळेच असते. अमूका सारख्या अमूक असे जरी आपण म्हणत असतो तरी कुणा एकासारखा कुणी एक अगदी तंतोतंत असूच शकत नाही. साम्य असेल, पण ङ्गार कमी प्रमाणात. अमुकासारखे होण्याचा हट्ट जेव्हा एखादी व्यक्ती धरते, तेव्हा त्याचे व्यक्तिमत्त्व ती आपल्यात उतरवू इच्छिते. केवळ नाव, शिक्षण, परिवार यांच्या आधारावर कुणालाही आपले व्यक्तित्व घडविता येत नाही.
कोणतीही व्यक्ती ही आपल्या गुणांनी ओळखली जाते. जीवनात नावाला आणि रूपाला जेवढे महत्त्व नाही तेवढे त्या व्यक्तीच्या गुणाला, कर्तृत्वाला आहे. व्यक्तीचे नाव हे केवळ त्याच्या संबोधनासाठी म्हणून आहे. एखाद्या व्यक्तीचे नाव जेव्हा आपण घेतो तेव्हा त्याचे संपूर्ण जीवन, त्याचे वैशिष्ठ्य, त्याचे गुण आपल्या नजरेसमोर येत असतात. व्यक्तीची संपूर्ण अभिव्यक्ती म्हणजे त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व होय.पुरुषाचे व्यक्तित्व आणि स्त्रीचे व्यक्तित्व यात ङ्गारसा ङ्गरक नाही. त्यामुळे व्यक्तिमत्त्वाच्या आधारावर पुरुषाला उत्कृष्ठ आणि स्त्रीला निकृष्ठ ठरवता येत नाही. जीवनाच्या सगळ्या क्षेत्रात आज स्त्रीने पुरुषाच्या बरोबरीने आपल्या श्रेष्ठतेचा झेंडा ङ्गडकवला आहे. पण असे जरी असेल तरी पुरुषांची आणि स्त्रियांची काही क्षेत्रे ही वेगळी आहेतच. त्यांच्या जीवनरितीत ङ्गरक आहे. भावनांच्या प्रगटीकरणातही ङ्गरक आहे.
स्त्री-पुरुष यांना आपण कितीही समान म्हटले तरी स्त्री ही निसर्गतःच पुरुषापेक्षा वेगळीच! तिला आपल्या व्यक्तिमत्त्वासाठी काही वेगळेच प्रयत्न करावे लागतात. स्त्रीला स्वतःच्या व्यक्तित्व विकासासाठी स्वावलंबी, स्वतंत्र आणि आत्मनिर्भय असायलाच हवे. तिचे विचार, तिची जीवनशैली, तिच्या आत्मविश्‍वासाचे रूप समर्थ असेच असते. जितके स्वावलंबी स्त्रियाचे व्यक्तित्व समर्थ असते तितकेच आपल्या पिता, पती किंवा अन्य पुरुषावर अवलंबून असणार्‍या स्त्रीचे व्यक्तित्व इतके समर्थ बहुधा दिसत नाही. अर्थात आपले प्रगल्भ व्यक्तिमत्त्व सिद्ध करण्यासाठी प्रत्येकांनी ऑङ्गिसात जाऊन नोकरीच करायला हवी, असे मात्र मुळीच नाही. आमची एक शेजारी आहे. ती कुठेही नोकरी करत नाही. पण अनेकांना ती नोकरीच करते असे वाटते. कारण तिचे प्रगल्भ व्यक्तिमत्त्व. उत्तम गृहिणी होऊन आपले घर उत्तमरित्या ती चालवते. घरातल्या सगळ्या जबाबदार्‍या पार पाडते. बाहेरची, बँकेची सगळी कामे तीच बघते. मुलांच्या समस्या, घराबाबतच्या आर्थिक समस्यांबाबतचे निर्णय ती स्वतःच्या जबाबदारीवर पार पाडते.
एव्हाना तिच्या यजमानांचा तिच्यावर इतका विश्‍वास बसलाय की आता ते उगाचच घरातल्या बाबींमध्ये लुडबुड करीतच नाही. सुशिक्षित आहेच. बोलण्याची पद्धती नम्र तर आहेच. गरज पडल्यास चांगलीच कडकलक्ष्मी. त्यामुळे कुठेही तिला आतापर्यंत वाईट अनुभव आलेला नाही. सगळ्या मॅनर्स, एटिकेट्‌सनी तिचे व्यक्तिमत्त्व परिपूर्ण आहे. आपल्या सोज्वळ बोलण्यातून ती कुणावरही सहज छाप पाडते. मात्र, याउलट अनेकदा नोकरी करणार्‍या स्त्रिया अतिशय गबाळ असतात. बोलण्यात अजिबात आत्मविश्‍वास नसतो. आपल्या चाकोरीबद्ध कामाच्या पलीकडे काय जग आहे याची त्यांना अजिबात कल्पना नसते. बँकेचा ङ्गॉर्म भरताना हात कापतो. एखाद्या मोठ्या ऑङ्गिसात गेल्या की, एखाद्या खेड्यातून आल्यासारख्या गांगरून जातात.
आरोग्य, गृहविज्ञान, आत्मविश्‍वास, व्यवहार कुशलता याचे शिक्षण जसे स्त्रीला मिळायला हवे तसेच आदर्श पत्नी, आई आणि भगिनी ठरण्यासाठी लागणारे शिक्षणही स्त्रियांनी घ्यायला हवे. अर्थात यासाठी तिला कोणत्या महाविद्यालयात जाऊन प्रशिक्षण घेण्याची गरज नाही. तर या सगळ्या गोष्टी आत्मसात करण्याची तयारी असेल तर अनुकरणाने आणि नवनवीन शिक्षणाच्या इच्छेने घडू शकते. निव्वळ शिक्षणाने व्यक्तित्वाची उंची वाढत नाही. एखाद्या स्त्रीने खूप परिश्रम घेऊन उच्च दर्जाची पदवी प्राप्त करून घेतली असली, तरी आपले जीवन दुसर्‍यांना आकर्षक, प्रेरक आणि आदर्श ठरण्यासाठी तिला आपल्या शिक्षणाचा, अनुभवाचा योग्यरित्या उपयोग करून जीवन शिळेतून सुंदर मूर्ती कशी आकारेल यासाठी प्रयत्नच करावे लागतील.
तथाकथित उच्च विद्याविभूषित स्त्रीपेक्षा एखादी अडाणी किंवा साधारण शिकलेली स्त्री ङ्गार चांगली असे म्हणण्याची पाळी अनेकदा आपल्यावर येते. कारण आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी शेजार्‍या पाजार्‍यांशी तिचे ङ्गार चांगले संबंध असतात. आपल्या हसर्‍या, मनमिळावू, प्रेमळ, कामसू स्वभावामुळे तिने सर्वांचे मन जिंकलेले असते. ती सर्वांना हवीशी वाटते. अनेकांना प्रेरक आदर्श वाटते. म्हणजेच गृहिणी म्हणून काम करणार्‍या स्त्रियादेखील आपले व्यक्तिमत्त्व अधिक आकर्षक बनवू शकतात.