स्कॉटलंडने स्वातंत्र्य नाकारले; यू. के. सोबतच राहणार

0
94

इंग्लंडसोबत राहायचे की स्वतंत्र व्हायचे या मुद्द्यावर काल स्कॉटलंडमध्ये घेण्यात आलेल्या सार्वमतात स्कॉटलंडवासीयांनी स्वातंत्र्य नाकारून युनायटेड किंगडममध्येच (यू.के.) राहणे पसंत केल्याचे, काल मतमोजणीनंतर स्पष्ट झाले.
५५.३ टक्के लोकांनी वेगळे होण्याविरोधात तर ४४.७ टक्के लोकांनी वेगळे होण्यासाठी मतदान केले. युनायटेड किंगडममधील तिसरे सर्वात मोठे शहर व स्कॉटलंडचे सर्वात मोठे शहर ग्लासगोने स्वातंत्र्यासाठी मतदान केले तर स्कॉटलंडची राजधानी एडीनबर्ग वासीयांनी स्वतंत्रराष्ट्र नाकारले. दरम्यान, स्वातंत्र्यासाठी मोहीम उघडलेले मंत्री आलेक्स सालमंड यांनी सर्वांनी लोकशाही मार्गाने आलेला हा निर्णय स्वीकारण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. ब्रिटनचे पंतप्रधान कॅमरून यांनी स्कॉटलंडवासीयांचे अभिनंदन केले व त्यांना जादा अधिकार देण्याचे आश्‍वासन दिले.
गेली दोन वर्षे कालच्या सार्वमतासाठी तयारी चालू होती.