पर्रा येथे रात्रीच्या वेळी रस्त्यावर बसलेल्या गुरांना स्कूटरची धडक बसून झालेल्या अपघातात रवी सेलेत (४२) हा जागीच ठार झाला. तो मूळ तामिळनाडू येथील असून सध्या साळगाव येथील एका हॉटेलात स्वयंपाकी म्हणून कामाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो गुरुवारी रात्री ११.३० च्या दरम्यान काम आटोपून जीए-०३-जे-४३९१ क्रमांकाच्या स्कूटरने साळगावहून पर्रामार्गे काणका येथील निवासस्थानी येत होता. तो पर्रा येथे पोचला असता अंधारामुळे रस्त्यावरील शेणावर स्कूटर घसरून जवळच ठाण मांडून बसलेल्या गुरांना जोराची धडक बसली. यावेळी त्याला गंभीर मार लागल्याने तो बेशुद्ध पडला. १०८ रुग्णवाहिकेने त्याला पेडे येथील जिल्हा इस्पितळात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.