सोमवारपासून मुलांना शाळेत पाठवणार नाही

0
224

>> मडगावात पालकांनी घेतली मुख्याध्यापकांची भेट

राज्यातील विद्यालयांत मुले व शिक्षकही कोविडबाधित सापडू लागल्याने पालकांत भीती पसरली असून काल मडगावातील काही विद्यालयांच्या मुख्याध्यापकांची पालकांनी भेट घेतली. यावेळी या पालकांनी मुख्याध्यापकांकडे कोविड स्थितीविषयी चिंता व्यक्त केली व आपल्या मुलांना सोमवारपासून शाळेत पाठवण्यास नकार दिला.

उसगाव, कुजिरा व वाळपईतील विद्यालयांत शिक्षक व विद्यार्थी कोविडबाधित झाल्याने सर्वच पालकांत भीती निर्माण झाली आहे. पालक शिक्षक संघाचा विरोध असतानाही सरकारने विद्यालयात दहावी व बारावीचे वर्ग सुरू केले. मात्र आता कोविडबाधित सापडू लागल्यानंतर सरकारने जबाबदारी शाळा व्यवस्थापनावर ढकलल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आंधप्रदेश तसेच हरयाणात शाळा सुरू केल्यानंतर शेकडो मुले व विद्यार्थी कोविडबाधित झाले. त्यामुळे त्यांनी शाळा बंद ठेवल्या. पण गोव्यातील सरकार अविचारीपणे वागत असल्याचा आरोप या पालकांनी केला.