सोनिया गांधी यांना पुन्हा ईडीचे समन्स

0
15

नॅशनल हेरॉल्ड मनी लॉंड्रिंग प्रकरणी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावले आहेत. २१ जुलै रोजी चौकशीसाठी त्यांना हजर राहण्यास सांगितले आहे. या अगोदर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची ईडीकडून सलग सहा दिवस चौकशी करण्यात आली होती. या अगोदरही सोनिया गांधी यांना ईडीकडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आला होता; मात्र कोविड आणि फुफ्फुसाच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल झाल्यानंतर सोनिया गांधी यांना घरी विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यामुळे त्यांनी ईडीला पत्र लिहून त्या पूर्णपणे बरे होईपर्यंत त्यांची चौकशी काही आठवडे पुढे ढकलण्याची मागणी केली होती.