सेवा द्या; नाहीतर निवृत्ती घ्या : काब्राल

0
11

>> अधिकार्‍यांना कडक इशारा

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांना कामकाजासाठी समर्पित क्रमांक दिले जाणार आहेत. अधिकार्‍यांनी चोवीस तास नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कार्यरत राहिले पाहिजे. अशा प्रकारची सेवा देणे शक्य नसलेल्या अधिकार्‍यांनी निवृत्ती घ्यावी, असा कडक इशारा सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिला.

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्त्यावरील खड्डे दुरुस्तीसाठी सुरू केलेल्या गोवा पीडब्ल्यूडी ऍपला नागरिकांकडून भरघोस प्रतिसाद लाभत आहे. या ऍपचा शुभारंभ केल्यानंतर अवघ्या काही तासांत २६० नागरिकांनी १५ ठिकाणच्या खड्‌ड्यांची माहिती अपलोड केली आहे. ऍपवर येणार्‍या तक्रारींनुसार निर्धारित वेळेत खड्‌ड्यांची दुरुस्ती केली जाणार आहे, असे काब्राल यांनी सांगितले.

पीडब्ल्यूडी ऍपमध्ये येत्या दीड वर्षाच्या काळात पाणीपुरवठा, मलनिस्सारण आदींच्या तक्रारीचा समावेश केला जाणार आहे. राज्यातील नागरिकांना किमान चार ते पाच तास पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, असेही ते म्हणाले.