Home बातम्या सेंट झेवियरच्या फेस्ताला हजारो भाविकांची उपस्थिती

सेंट झेवियरच्या फेस्ताला हजारो भाविकांची उपस्थिती

0

जुने गोवे येथील चर्चतर्फे होणारे सेंट फ्रान्सिस झेव्हियर यांचे ‘फेस्त’ व त्रिदिनोत्सव काल हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिक्तीभावात संपन्न झाले. फेस्तानिमित्त होणाऱ्या प्रार्थनेला हजर राहण्यासाठी काल पहाटे 4 वाजल्यापासून भाविकांनी गर्दी केली होती. चर्चमध्ये जाण्यासाठी लांब रांगा लागल्या होत्या.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, उद्योगमंत्री माविन गुदिन्हो, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार क्रुझ सिल्वा, कार्लुस फेरेरा, आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, आमदार एल्टन डिकॉस्टा, बाबुश मोन्सेर्रात आदींनी हजेरी लावून प्रार्थनेत भाग घेतला.

सेंट फ्रान्सिस झेव्हियरचे फेस्त हे जगप्रसिद्ध असून काल फेस्तासाठी देश-विदेशांतून भाविक आले होते. मुख्यमंत्री डॉ. सावंत, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पर्यटनमंत्री खंवटे, विरोधी पक्षनेते आलेमाव, मंत्री गुदिन्हो आदींनी भाविकांना फेस्तानिमित्त शुभेच्छा दिल्या.
फेस्तानिमित्त परिसरात चोख पोलीस बंदोबस्त होता. त्याशिवाय वैद्यकीय पथके, मोबाइल क्लिनिक्स, आपत्कालीन सेवा तैनात करण्यात आली होती.