सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणास अमली पदार्थ व्यवहाराची बाजू?

0
132

>> अमली पदार्थविरोधी विभागाकडून गुन्हा नोंद

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात संभाव्य अमली पदार्थ सेवनाची बाजू त्याची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्या व्हॉटस्‌ऍप चॅटमधून समोर आली असल्याने या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळाली आहे. काल अमलीपदार्थविरोधी विभागाने यासंदर्भात रीतसर गुन्हा नोंदवून घेतला.

व्हॉटस्‌ऍप चॅटमध्ये रिया ही एमडीएमए आणि मारिजुआना या अमली पदार्थांविषयी वक्तव्य करीत असल्याचे दिसत असल्याने सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाशी अमली पदार्थ सेवनाचा काही संबंध असावा का या दृष्टीने तपास होण्याची गरज निर्माण झाली आहे.

रिया आणि अन्य एका व्यक्तीदरम्यान मार्च २०१७ मध्ये झालेल्या संभाषणात अमली पदार्थांचा उल्लेख झाला असून गेल्या वर्षी २५ नोव्हेंबर रोजी जया सहा यांना पाठवलेल्या एका संदेशात आपण वॉटरस्टोनमध्ये सीबीडी ऑईल पाठवीत आहे असा उल्लेख आहे.

सुशांत व रिया मुंबईच्या वॉटरस्टोन रिसॉर्टमध्ये दोन महिने जाऊन राहिले होते. अशाच प्रकारचे आणखी उल्लेखही व्हॉटस्‌ऍप संभाषणांत आढळून येत आहेत. या अमली पदार्थाचे चहा, कॉफीमध्ये चार थेंब टाकावेत असा सल्लाही सदर व्यक्ती रियाला देत असल्याचे आढळून आले आहे. रिया आणि सुशांतचा व्यवस्थापक सॅम्युएल मिरांडा यांच्यातील संभाषणही तपास यंत्रणेच्या हाती लागले आहे. दरम्यान, रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी सदर आरोप फेटाळून लावला आहे.