सुरक्षेबाबतचा आढावा घेऊनच जाहीर प्रचार सभांना मान्यता

0
207

>> निवडणूक आयोगाकडून स्पष्ट

राज्यात जिल्हा पंचायत निवडणुकीच्या जाहीर प्रचार सभांना आवश्यक सुरक्षा उपाययोजनांचा आढावा घेऊन संबंधित अधिकार्‍यांकडून मान्यता दिली जाणार आहे, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

कोरोनाच्या विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर जाहीर सभांवर निर्बंध घालण्याची सूचना करण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने जाहीर प्रचार सभांना मान्यता देण्याबाबत स्पष्टीकरण केले आहे.

मतमोजणी केंद्रे जाहीर
दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा पंचायत निवडणुकीच्या मतमोजणी केंद्राची नावे जाहीर केली आहे. तिसवाडी – बांबोळी येथील स्टेडियम, सत्तरी -वाळपई वनप्रशिक्षण केंद्र सभागृह, बार्देश १ व २ – पेडे इनडोअर स्टेडियम, क्रीडा संकुल, पेडणे – विर्नोडा सरकारी महाविद्यालय, डिचोली – झांट्ये महाविद्यालय सभागृहात होईल. तर दक्षिण गोव्यातील मतमोजणी – सासष्टी – माथानी साल्ढाणा प्रशासकीय संकुल तळमजला, सांगे – सरकारी क्रीडा संकुल, धारबांदोडा – सरकारी प्राथमिक विद्यालय, केपे – क्रीडा संकुल केपे, काणकोण – नगरपालिका सभागृह, फोंडा – आयटीआय वाचनालय फर्मागुडी, मुरगाव – मुरगाव पोर्ट इन्स्टिटूट वास्को येथे करण्यात येईल.