सुकूर-पर्वरीमध्ये आढळला एका इसमाचा मृतदेह

0
12

सुकूर पर्वरी येथील होली फॅमिली शाळेजवळ परशुराम चंद्रप्पा नाईक (43) या इसमाचा मृतदेह गोमेकॉमध्ये आणल्याचा संदेश पर्वरी पोलीस स्थानकात आला असता पर्वरीचे पोलीस उपनिरीक्षक मयूर सावंत यांनी सूकूर येथे घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. प्रथमदर्शनी पर्वरी पोलीस स्थानकात विजेचा धक्का बसून मृत्यू झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. गोमेकॉमध्ये शवचिकित्सेनंतर डॉक्टरांनी त्याला मायोकार्डियल इन्फेक्शनने मृत्यू झाल्याचे निदान केले. शवचिकित्सानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी अधिक तपास पर्वरी पोलीस करीत आहेत.