कोविड-१९चा संसर्ग झालेले दीपक चहर आणि ऋतुराज गायकवाड यांच्या व्यतिरिक्त कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि चेन्नई सुपर किंग्जच्या अन्य खेळाडूंनी काल शुक्रवारी सरावास सुरुवात केली. काल तिसर्या फेरीतील टप्प्यात खेळाडूंच्या घेतलेल्या कोरोना चाचणींचा अहवाल निगेटिव्ह आला आल्यानंतर सीएसकेने सरावास सुरुवात केली.
गेल्या आठवड्यात सीएसकेचे गोलंदाज दीपक चहर आणि ऋतुराज गायकवाड व अन्य ११ सदस्य कोविड-१९ पॉझिटिव्ह आढळले होते. त्यामुळे त्यांना सहा दिवसांच्या अलगीकरणानंतर आपली प्रशिक्षण योजना स्थगित करावी लागली होती. त्यानंतर आता गुरुवार ३ रोजी खेळाडूंची आणखी एक अतिरिक्त चाचणी केली गेली त्यात उर्वरित १३ खेळाडू निगेटिव्ह आढळल्याने त्यांचा सराव करण्याचा रस्ता मोकळा झाला. जे खेळाडू पॉझिटिव्ह आढळलेले आहेत त्यांची १४ दिवसांच्या अलगीकरणानंतर पुन्हा एकदा चाचणी घेण्यात येणार असल्याचे, सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी केएस विश्वनाथन यांनी स्पष्ट केले.
आयपीएल २०२०साठीचा चेन्नई सुपर किंग्ज संघ ः महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), शार्दुल ठाकुर, केएम आसिफ, दीपक चहर, इम्रान ताहिर, कर्ण शर्मा, एन. जगदीशन, मोनू कुमार, मिचेल सँटनर, रवींद्र जडेजा, लुंगी एन्गिडी, केदार जाधव, ड्वेन ब्राव्हो, ऋतुराज गायकवाड, मुरली विजय, फा डु’प्लेसिस, सुरेश रैना, अंबाती रायडू, शेन वॉटसन, पीयुष चावला, जोश हेझलवुड, सॅम कर्रन, आर साई किशोर.