‘सिली सोल्स’ प्रकरणी २२ ऑगस्टला सुनावणी

0
20

केंद्रीय महिला आणि बाल कल्याण खात्याच्या मंत्री स्मृती इराणी यांच्या मुलीच्या कथित बेकायदेशीर सिली सोल्स रेस्टॉरंट अँड बार प्रकरणी ऍड्. आयरिश रॉड्रिग्ज यांनी केलेल्या तक्रारीवर गोवा अबकारी आयुक्त नारायण गाड यांनी काल सुनावणी घेतली. या प्रकरणी पुढील सुनावणी आता दि. २२ ऑगस्ट रोजी होणार आहे. यावेळी झालेल्या सुनावणीवेळी बार मालकांच्यावतीने बाजू मांडताना त्यांच्या वकिलांनी एकदा शुल्क भरले की नूतनीकरण केलेला अबकारी परवाना चालू राहतो, असे सांगितले. हा परवाना मिळवण्यासाठी खोटी व अयोग्य कागदपत्रे सादर करण्यात आली होती का, तसेच खोटी माहिती पुरवण्यात आली होती का यासंबंधी आणि अबकारी अधिकार्‍यांनी आपले कर्तव्य बजावताना गैरमार्गांचा अवलंब केला होता का, या प्रश्‍नांची लेखी उत्तरे देण्याचा आदेश प्रतिवादींना दिला आहे, असे तक्रारदार ऍड्. आयरिश रॉड्रिग्स यांनी सांगितले.