सिलिंडरच्या दरात आजपासून कपात

0
142

आज दि. १ एप्रिलपासून सिलिंडरच्या दरात १० रुपयांची कपात होणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलसोबतच एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे इतर महागाईही वाढली आहे. त्यामुळे आजपासून होणार्‍या सिलिंडर दर कपातीमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सिलिंडरचे नवे दर आज दि. १ एप्रिलपासून लागू होणार आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर घसरल्यामुळे सिलिंडरचे दरही उतरणार आहेत. गेल्या आठवड्याभरात पेट्रोल, डिझेलच्या दरात तीनवेळा कपात झाली आहे.