सिद्धी नाईक मृत्यू प्रकरणाचा तपास योग्य दिशेने : मुख्यमंत्री

0
115

कळंगुट किनार्‍यावर संशयास्पद स्थितीत मृतदेह सापडलेल्या सिद्धी नाईक हिच्या मृत्यू प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू आहे, अशी माहिती काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

या प्रकरणाची चौकशी गुन्हा अन्वेषण विभागाकडून सुरू असून, आपण स्वत: गुन्हा अन्वेषण विभागाच्या अधिकार्‍यांकडून तपासकामाबाबत माहिती जाणून घेतली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या प्रकरणाची तपशीलवार चौकशी सुरू असून, तपासकामात कोणतीही हयगय केली जात नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.