साहाय्यक उपनिरीक्षक पदाखालील पोलिसांनी वाहने अडवू नयेत

0
20

>> पोलीस अधीक्षकांचा आदेश जारी

राज्यातील साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि त्यावरील पोलीस अधिकार्‍यांना वाहतूक नियमभंग प्रकरणी वाहन चलन देण्याचा अधिकार आहे. साहाय्यक उपनिरीक्षकपदाखालील पोलीस कर्मचार्‍यांनी कुठल्याही परिस्थितीत वाहन तपासणीसाठी अडवू नये, असा दुरुस्ती आदेश पोलीस अधीक्षक (वाहतूक) एस. एम. प्रभुदेसाई यांनी काल जारी केला आहे.

राज्यात पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांना वाहतूक चलन देण्याचा अधिकार असल्याचा आदेश पोलीस महानिरीक्षक ओंमीवीर सिंग यांनी १४ जुलै २०२२ रोजी जारी केला होता.

वाहतूक पोलिसांकडून वाहन कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी वाहने अडविली जातात. या तपासणीच्या माध्यमातून पोलिसांकडून वाहनचालकांची सतावणूक केली जात असल्याचा आरोप केला जात होता. पोलीस हे जनतेला सेवा देण्यासाठी असून त्यांनी समस्या सोडविल्या पाहिजेत. वाहतूक सुरळीत ठेवणे हे वाहतूक पोलिसांचे काम आहे. केवळ वाहतूक नियमाचे उल्लंघन होत असल्यास वाहन थांबवावे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍याला पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांनी चलन द्यावे. इतर कुठल्याही पोलिसाने वाहतूक नियमभंग प्रकरणी वाहन चलन देऊ नये, असे पोलीस महानिरीक्षक सिंग यांनी आदेशात म्हटले होते.