सावईवेरे येथे माडावर बिबट्या पडला अडकून

0
10

फोंडा तालुक्यातील सार्वईवेरे गावातील कुळणवाड्यावर एक बिबटा काल लोकवस्तीतील एका माडावर अडकून पडण्याची दुर्मीळ घटना घडली. बिबटा माडावर अडकून पडल्याचे लोकांना कळल्यानंतर स्थानिक लोकांमध्ये घबराट पसरली. नंतर ह्या बिबट्याची माडावरून सुरक्षित सुटका करण्यासाठी वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आले.

कुळणवाडा येथे कुळागरे असून मागील बाजूला जंगल परिसर आहे. सदर बिबटा हा अन्नाच्या शोधात कुळणवाडा येथे आला असावा, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. बिबटा अशोक सावईकर यांच्या घराशेजारील माडावर चढल्यानंतर तेथेच अडकून पडला. सावईकर कुटुंबीयांचे या बिबट्याकडे लक्ष गेल्यानंतर त्यांची घाबरगुंडी उडाली. त्यांनी नंतर वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना कळवले. नंतर वन कर्मचाऱ्यांना बिबट्याला पकडण्यासाठीची मोहीम हाती घेतली. नंतर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले.