साळगावकरचा पहिला विजय

0
54

जॉयल संडे आणि रिभव देसाई यांनी नोंदविलेल्या गोलांच्या जोरावर साळगावकर फुटबॉल क्लबने कळंगुट असोसिएशन स्पोटर्‌‌स क्लबवर २-१ अशा गोलफरकाने मात करीत गोवा फुटबॉल संघटना आयोजित प्रो-लीग स्पर्धेत आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली.
या विजयामुळे साळगावकर फुटबॉल क्लबचे पाच सामन्यातून ४ गुण झाले आहेत. तर कळंगुट असोसिएशन तेवढ्याच लढतींतून ८ गुणांवर आहेत.

ओंकार मोरेने ३९व्या मिनिटाला कळंगुट असोसिएशनचे खाते खोलले होते. तर दुसर्‍या सत्रात दमदार पुनरागन करताना साळगावकर एफसीने दोन गोल नोंदवित स्पर्धेतील आपला पहिला विजय नोंदविला. जॉयल संडेने ४६व्या मिनिटाला साळगावकरला १-१ अशी बरोबरी साधून दिली. तर रिभव देसाईने ७२व्या मिनिटाला साळगावकरच्या २-१ अशा विजयावर शिक्कामोर्तब केला.