सायबर गुन्हे, कायदे आणि आपण

0
1461

इंटरनेट-डिजिटल क्रांतीमुळे एका क्लिकवर सर्व जग सामावले गेले आहे. मित्र, नातेवाईकांशी चॅटिंग करण्याबरोबरच खरेदी, बॅकिंग व्यवहार या सर्व गोेष्टी एका बटणावर सामील झाल्या आहेत. मात्र जगाला कवेत घेणारे इंटरनेट हे आपले जगही बदलू शकते. सोशल मीडियावर केलेली गडबड आपल्या अंगलट येऊ शकते. या गोष्टींबाबात आजही वापरकर्ते अनभिज्ञ आहेत. आज सायबर गुन्हे वेगाने वाढत असताना नागरिक मात्र त्याकडे कानाडोळा करताना दिसून येत आहेत. पुण्यातील एका नामांकित बँकेतील सुमारे ९० कोटी रुपये सायबर क्राईमच्या रुपातून विविध देशांत काढले गेले. अशा प्रकारच्या घटना सतत कोठे ना कोठे घडत असतात. याचा आपल्याला प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष ङ्गटकाही बसू शकतो.
सायबर गुन्ह्यांमुळे अनेकांचा पैसा डोळ्यांदेखत गायब झाला आहे. काहीवेळा आपणही या घटनेला जबाबदार असतो. कोणत्याही खोट्या कॉलला दिलेला प्रतिसाद हा आपल्याला आर्थिक अडचणीत आणू शकतो. यासंदर्भात सरकार आणि बँकांकडून वारंवार सूचना देऊनही लालसेपोटी, अमिषापोटी काही खातेदार बनावट मेलला बळी पडतात आणि नकळतपणे आर्थिक चक्रव्यूहात ङ्गसत जातात. वाढत्या सायबर गुन्हेगारीच्या पार्श्‍वभूमीवर आपल्याला काही मूलभूत गोष्टींची माहिती गरजेचीच आहे.
सायबर क्राइम म्हणजे काय?
इंटरनेटच्या माध्यमातून होणारे गुन्हे हे सायबर क्राईमच्या श्रेणीत येतात. इंटरनेटवरून क्रेडिट कार्डचे क्लोनिंग करून पैसे काढून घेणे, ब्लॅक मेलिंग, कॉपीराइट आणि ट्रेडमार्क ङ्ग्रॉड, पोर्नोग्राङ्गी, कोणत्याही सॉफ्टवेअरच्या माध्यमातून व्हायरस पाठवणे, आपत्तीजनक किंवा धमकीवजा संदेश पाठवणे या बाबींचा सायबर क्राईममध्ये समावेश होतो. गेल्या काही वर्षात सायबर क्राईमची व्यापकता अधिकच वाढली आहे. अशा स्थितीवर मात करण्यासाठी सायबर क्राईम सेल आहे.
गुन्हा सिद्ध करणे कठीण
सायबर गुन्हेगारांसाठी कायदा आहे, मात्र तो गुन्हा सिद्ध करणे कठीण असते. सोशल साईटवर हे गुन्हेगार आपल्या नावाने अनेक प्रकारचे खाते सुरू करतात आणि कायदेशीरपणे आपला ङ्गोटोही अपलोड करतात. आज आपल्याला पंतप्रधानांपासून बॉलिवूड कलांकारांपर्यंत अनेक खोटी खाती या सोशल साईटस्‌वर पाहवयास मिळतील.
मानसशास्त्रज्ञांचे मत: अलीकडील काळात मुले आणि महिलांविरुद्ध होणारे सायबर गुन्हे वाढले आहेत. सायबर बुलिंग, इमेल स्पूङ्गिंग, चॅट आदींच्या माध्यमातून मानसिक अत्याचार केला जातो. यामुळे मुलांंच्या मनात ङ्गोबिया निर्माण होतो. कालांतराने मुले किंवा महिला या इंटरनेट वापरण्यास धजावत नाहीत. काही वेळा ही बाब नैराश्य आणि आत्महत्येपर्यंत पोचू शकते.
तसे पाहिले तर सोशल मीडिया वाईट नाही, मात्र त्याचा वापर सावधानतेने वापर करायला हवा. ज्याप्रमाणे गॅस ऑन केल्यानंतर तो बंद करणे गरजेचे आहे, तसेच संगणक/लॅपटॉप आणि स्मार्टङ्गोन वापरानंतर त्यास लॉग आऊट करणे अत्यावश्यक आहे. अनेकदा यूजर ङ्गोनवर लॉगआऊट करत नाहीत, ही बाब चुकीची आहे. ही प्राथमिक बाब लक्षात घेतल्यानंतर अन्यही काही गोष्टी लक्षात घ्या. सायबर बुलिंगला बळी पडल्यावर सर्वात अगोदर सोशल नेटवर्किंग साईटला सूचना द्या. तक्रार दाखल करण्याबरोरच एसएमएसचा इलेक्ट्रॉनिक पुरावा असणे देखील महत्त्वाचे आहे. पुरावा नसेल तर आपण संबंधित सोशल साईटला त्यासंदर्भात माहिती द्या. कारण सोशल नेटवर्किंग कंपन्यांना यासंदर्भात जबाबदार धरले जाते. पोलिस किंवा न्यायालयाने पुरावे मागितल्यानंतर ते सादर करणे सोशल मीडिया कंपनीला बंधनकारक आहे. पोलिसांना मदत न केल्यास न्यायालय कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करू शकते.
सायबर गुन्ह्यांचे विविध स्वरुप: सायबर दहशतवाद: सायबर घडामोडींतून धार्मिक, राजकीय, सामाजिक दहशत निर्माण करणे हे प्रकार सायबर दहशतवादातर्ंगत येतात. हा दहशतवाद कोणत्याही देशाच्या सुरक्षेला हानी पोचू शकतो.
आर्थिक गुन्हे: आजघडीला बहुतांश बँकांचे काम हे इंटरनेटवर होत आहे. व्यापार देखील इंटरनेटवर केला जात आहे. क्रेडिट कार्डच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने पैसे काढून घेणे, ऑनलाइन व्यापार किंवा बँकिंगमध्ये ङ्गसवणूक करणे या सर्व गोष्टी आर्थिक सायबर गुन्ह्यात सामील होतात.
ङ्गिशिंग: आपल्या मेल आयडीवर असे काही मेल येतात की, ते कोणत्या ना कोणत्या बँकेचे किंवा अन्य वित्तिय संस्थेचे संकेतस्थळ आहे, असे भासवले जाते. हे आपल्या बँकेच्या खात्याची किंवा अन्य व्यक्तीगत माहिती विचारण्याचा प्रयत्न करतात. हे सर्व मेल बनावट असतात आणि हे आपली वैयक्तिक माहितीची चोरी करून गैरव्यवहार करतात. त्याला आपण ङ्गिशिंग म्हणतो. यासारख्या कोणत्याही मेलला उत्तर देऊ नये.
सायबर हेरगिरी: यास ऍडव्हेअर किंवा स्पायवेअर असेही म्हटले जाते. आपल्या संगणकात परवानगीने किंवा परवानगी न घेता ते संगणकाला जोडले जातात. आपल्या ऍक्टिव्हिटिज आणि वैयक्तिक माहिती गोळा करून ते अन्य संस्थेला देतात. अशा प्रकारचे स्पायवेअर किंवा ऍडव्हेअर हे संगणकाचे काम संथ करतात.
ओळखीची चोरी: एखाद्या व्यक्तीकडून एखाद्या व्यक्तीची ओळख चोरणे किंवा त्याची इलेक्ट्रॉनिक सही हॅक करणे किंवा अन्य नावाने बनावट काम करणे त्यास आपण ओळखीची चोरी असे म्हणतो. अशा प्रकारचा अपघात टाळण्यासाठी आपल्या नेट बँकिंगच्या, मेलच्या पासवर्डमध्ये नंबर तसेच विशेष चिन्हांचा अवश्य वापर करा. कालांतराने पासवर्ड बदलत राहा. पासवर्ड कोणासोबतही शेअर करू नका.
स्पॅम: स्पॅममध्ये इच्छा नसलेला मेल येतात. हा देखील सायबर गुन्हा आहे. अनेकदा चिठ्ठी लिहणार्‍या व्यक्ती आपल्याला एक पत्र पाठवून त्यांचे पत्र वाचण्याचे सांगतात आणि उत्तर देण्यास प्रवृत्त करतात. ही बाब चुकीची आहे. हे इंटरनेट शिष्टाचाराविरुद्ध आहे आणि सायबर गुन्हा देखील आहे.
स्पिम: स्पॅमध्ये इच्छा नसलेले मेल येतात तर स्पिम इंटरनेटमध्ये इच्छा नसलेल्या बाबींवर चर्चा होते. इंटरनेटवर पाठलाग करणे, त्रास देणे, भिती दाखवण्याचे काम करणे हे सर्व काम इंटरनेटवर केले जाते. त्याला स्टॉकिंग असेही म्हटले जाते.
सायबर छळ: अनेकदा अनोळखी मेल, संदेश आपल्या मोबाईलवर येतात. संदेश पाठवणारी महिला विधवा आहे, तिच्या नवर्‍याचा मोठा पैसा अडकून पडला आहे आणि यासाठी तुमची मदत हवी आहे अथवा एखादा मुलगा गंभीर आजारी असून त्याला पैशाची निकड आहे, असेही संदेश येतात. याशिवाय आपल्या मोबाईल नंबरने कोट्यवधीची लॉटरी जिंकली असून ते पैसे मिळवण्यासाठी संपर्क करा. खरे तर या बाबी खोट्या असतात. आपली ङ्गसवणूक करून पैसा उकळण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. हा एक सायबर गुन्हा आहे. त्यावर कधीही अंमल करू नये.