सानिया मिर्झाचे आत्मचरित्र जुलैमध्ये प्रकाशित

0
101

भारतीय महिला टेनिसस्टार सानिया मिर्झाने आपल्या टेनिस प्रवासावर आत्मचरित्र लिहिले असून ते जुलैमध्ये प्रकाशित होणार आहे.
‘एस अगेन्स्ट ऑड्‌स’ नामक या पुस्तकात सानियाने महिला दुहेरीत विश्‍व क्रमांक एकवर झेप घेण्यापर्यंतच्या प्रवासाचा आढावा घेतला आहे, असे प्रकाशकांनी दिलेल्या माहितीनुसार समजते.
सानियाचे यश विलक्षण आहे आणि तिचे आत्मचीरत्र प्रेरणादायी आहे. तिच्या पुस्तकासाठी सहयोग हा आम्ही बहुमान समजतो, असे प्रकाशक कार्तिका व्ही. के. आणि मुख्य संपादक हार्पर कॉलिन्स यांनी म्हटले आहे. १६व्या वर्षी विम्बल्डन चँपियनशीपमध्ये मुलींच्या दुहेरीचे जेतेपद मिळवून २९ वर्षीय भारतीय टेनिसस्टार प्रकाशझोतात आली होती. भारताची महिला आणि दुहेरीतील अग्रणी खेळाडू असलेल्या सानियाने २०१२ मध्ये एकेरीतून निवृत्ती पत्करली होती. ऑगस्ट २०१५ ते मार्च २०१६ या कालावधीत तिने मार्टिना हिंगिसच्यासाथीत सलग ४१ विजय मिळवित महिला दुहेरीत अग्रक्रमांक पटकावला.
पिता इम्रान ताहिर यांच्या सहयोगाने सानियाने लिहिलेल्या या पुंस्तकात तिच्या आयुष्यातील संस्मरणीय चढउतारांचा समावेशही आहे.