सातव्या वेतन आयोगाच्या शिङ्गारशी त्वरित लागू करा

0
83

>> लुईझिन ः कर्मचार्‍यांत नाराजीचा दावा

 

गोवा सरकारने सातव्या वेतन आयोगाच्या शिङ्गारशींची ताबडतोब अंमलबजावणी करावी अशी मागणी प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष लुईझिन ङ्गालेरो यांनी काल पत्रकार परिषदेत केली.
कॉंग्रेस सरकारच्या काळात सहाव्या वेतन आयोगाच्या शिङ्गारशी लागू करण्याच्या बाबतीत चालढकल केली नव्हती. सातवा वेतन आयोगही कॉंग्रेसनेच स्थापन केला होता. केंद्र सरकारने शिङ्गारशी लागू केल्या. परंतु गोवा सरकारने अद्याप शिङ्गारशींच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचनाही जारी केलेली नाही. त्यामुळे सरकारी कर्मचार्‍यांमध्ये नाराजी पसरली असल्याचा दावा ङ्गालेरो यांनी यावेळी केला.
या प्रश्‍नावर गोवा सरकारी कर्मचारी संघटनेच्या नेत्यांकडेही आपण चर्चा केली आहे. सरकारच्या कर्मचारी विरोधी धोरणामुळे कर्मचार्‍यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे, असे त्यांनी सांगितले. सहाव्या वेतन आयोगाने कर्मचार्‍यांच्या वेतनात वीस टक्क्यांवरून चाळीस टक्के वाढ केली होती. सातव्या वेतन आयोगाच्या शिङ्गारशीनुसार ङ्गक्त १४ टक्के वाढ केली आहे, असे असतानाही कर्मचार्‍यांवर अन्याय का? असा प्रश्‍न ङ्गालेरो यांनी केला.
नव्या चेहर्‍यांना संधी देणार
अ. भा. कॉंग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी दिल्लीत बोलावलेल्या बैठकीस कॉंग्रेसचे काही आमदार गैरहजर का राहिले, या प्रश्‍नावर पत्रकारांनी प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष लुईझिन ङ्गालेरो यांना छेडले असता, कॉंग्रेस नव्या चेहर्‍यांना संधी देणार, असे सांगून गांधी यांनी चाळीसही मतदारसंघात काम करण्यास सांगितल्याचे ङ्गालेरो यांनी सांगितले.
सध्या अनेकजण कॉंग्रेस प्रवेश करीत आहेत, असे सांगन शिवोली मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे गट प्रमुख राजेश कोचरेकर, राजन घाटे व दीपक धारगळकर यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे ङ्गालेरो यांनी जाहीर केले. येत्या ४ नोव्हेंबर रोजी तेथील हजारो कार्यकर्ते कॉंग्रेसप्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले.