सागरी वाद शांततेने सोडवणे गरजेचे : मोदी

0
60

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदे (यूएनएससी)च्या काल झालेल्या बैठकीत ‘समुद्री सुरक्षेला चालना : आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज’ या विषयावर उच्चस्तरीय खुली चर्चा झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अध्यक्षस्थानावरून बोलताना सागरी सुरक्षेवर भाष्य केले.

सागरी वाद शांततेने आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या आधारावर सोडवायला हवे. जागतिक शांतता आणि स्थिरता सुनिश्चित करण्याचा हा एकमेव मार्ग आहे, असे मोदी यावेळी म्हणाले.
ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली, त्यात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्य देशांचे पंतप्रधान किंवा राष्ट्रपती, संयुक्त राष्ट्रांचे उच्चपदस्थ अधिकारी आणि प्रादेशिक संघटनाचे प्रमुख उपस्थित होते.