सागरी बचाव केंद्रामुळे अनेकांचे प्राण वाचविण्यास मदत

0
6

>> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

>> ओएनजीसीचे सागरी बचाव केंद्र राष्ट्राला समर्पित

गोव्यातील ओएनजीसीचे सागरी बचाव केंद्र राष्ट्राला समर्पित करताना अत्यानंद होत आहे. हे अत्याधुनिक केंद्र सागरी बचाव प्रशिक्षण परिसंस्थेत आपला ठसा उमटवण्याच्या दृष्टीने भारतासाठी एक महत्त्वाचा क्षण आहे. कठोर आणि तीव्र आपत्कालीन प्रतिसाद प्रशिक्षण प्रदान केल्याने अनेकांचे जीव वेळीच वाचवता येतील असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल बेतुल येथे केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गोव्यातील बेतूल येथील ओएनजीसी संस्थेच्या एकात्मिक सागरी बचाव प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन काल झाले. याप्रसंगी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी वरील उद्गार काढले. पाण्याखालील बचावकार्यांची माहिती आणि प्रशिक्षण केंद्राची प्रात्यक्षिके देखील पंतप्रधानांनी यावेळी पाहिली.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, आम्हांला आधुनिक सागरी बचाव केंद्राची गरज होती. हे केंद्र आपल्या देशासाठी खूप फायदेशीर ठरेल, असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. यावेळी पंतप्रधानांनी आधुनिक सागरी बचाव केंद्राची गरज अधोरेखित करणाऱ्या एका चित्रफितीचा शुभारंभ केला.

यावेळी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय पेट्रोलियम, तेल आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पंतप्रधानांनी आधुनिक सागरी बचाव केंद्राची गरज अधोरेखित करणाऱ्या एका चित्रफितीचा शुभारंभ केला. देशाला आधुनिक सागरी बचाव केंद्राची गरज होती. हे केंद्र आपल्या देशासाठी खूप फायदेशीर ठरेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी

दरवर्षी 15 हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

ओएनजीसीचे सागरी बचाव केंद्र हे भारतीय सागरी बचाव प्रशिक्षण परिसंस्थेला जागतिक मानकांपर्यंत नेण्यासाठी एक विलक्षण असे एकात्मिक सागरी बचाव प्रशिक्षण केंद्र म्हणून विकसित केले आहे. येथे दरवर्षी 10 ते 15 हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाईल. आपत्कालिन हवामान स्थितीतील प्रशिक्षण, प्रशिक्षणार्थींची सागरी कौशल्ये विकसित करून वास्तविक जीवनातील आपत्तींपासून सुरक्षित बचावाचे प्रशिक्षण दिले जाईल.