सागरपुत्र, रैना इलेव्हन, अमेझिंग, गोवा पोलिस पुढील फेरीत

0
106

>> सनशाईन क्रिकेटर्स अ. भा. क्रिकेट स्पर्धा

सागरपुत्र कारवार, रैना इलेव्हन मुंबई, अमेझिंग मडगाव आणि गोवा पोलिस संघांनी साखळी सामन्यांत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत बेंडवाडा-सांगेच्या सनसाईन क्रिकेटर्सने आयोजित केलेल्या अखिल भारत टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेच्या पुढील फेरीत प्रवेश केला.

सांगे मैदानावर खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेत काल खेळविण्यात आलेल्या साखळी लढतींत कारवारच्या सागरपुत्र संघाने निक्की बॉईज आणि मध्यप्रदेशच्या सलोजा इलेव्हन संघांना पराभूत केले. मुंबईच्या रैना इलेव्हन संघाने सागरपुत्र आणि सलोजा इलेव्हन तर गोवा पोलिसांनी चंडिगडच्या साई इलेव्हन व धीरज इलेव्हन संघावर मात केली.